लॉकडाऊन काळात घरपट्टी, नळपट्टी माफ करा : कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:38 AM2021-04-25T04:38:01+5:302021-04-25T04:38:01+5:30
वाठार स्टेशन : कोरोनाने सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात माणूस जगवणं गरजेच आहे, अशा कठीण परिस्थितीत ...
वाठार स्टेशन : कोरोनाने सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात माणूस जगवणं गरजेच आहे, अशा कठीण परिस्थितीत ग्रामीण भागातील लोकांना दिलासा देण्यासाठी किमान त्यांची घरपट्टी व नळपट्टी माफ करावी, याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे, अशी माहिती देऊरचे सरपंच शामराव कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कदम म्हणाले, ‘कोरोना महामारीपासून ग्रामीण जनता वाचावी, यासाठी उत्तर कोरेगाव तालुक्यातील गावागावांत जनजागृती होणं आवश्यक आहे. समूह संसर्ग रोखणे, तसेच कोरोनाबाबतीत शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळणे गरजेच आहे. दररोजची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी आरोग्य सेवेवर जास्तीतजास्त लक्ष देणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न गावोगावी होणे आवश्यक आहेत, तसेच जास्तीतजास्त लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेच आहे.
महावितरण कंपनीनेही लोकांना वीजबिलाची सक्ती करू नये.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल कदम, मुधाई शिक्षण संस्थेचे चेअरमन धनशिंग कदम, अजित कदम, प्रकाश देशमुख, भूजंगराव कदम, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन वसंत कदम, युवराज कदम, ठेकेदार हणमंत फडतरे उपस्थित होते.