घर सजविणारे नाजूक हात आता बांधू लागले इमारत...आर्किटेक्चर सीमा दिवटे बनल्या बिल्डर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:41 PM2018-03-07T23:41:54+5:302018-03-07T23:44:41+5:30
सातारा : बांधकाम क्षेत्रात पुरुषांची असलेली मक्तेदारी मोडीत काढून स्वत: अस्तित्व उभारणाºया महिला अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत.
स्वप्नील शिंदे ।
सातारा : बांधकाम क्षेत्रात पुरुषांची असलेली मक्तेदारी मोडीत काढून स्वत: अस्तित्व उभारणाºया महिला अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत. त्यात साताºयासारख्या छोट्या शहरात स्वत:चे स्थान निर्माण करणाºया आर्किटेक्चर सीमा जाधव-दिवटे यापैकीच एक आहेत.
सीमा जाधव-दिवटे यांनी वडिलांच्या सांगण्यावरून आर्किटेक्चर होण्यासाठी आवश्यक सीईटी परीक्षेत त्यांनी राज्यात चौथा क्रमांक मिळाला. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या प्रिन्स शिवाजी कॉलेजमधून आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सातारा तसेच पुणे शहरातील काही ज्येष्ठ आर्किटेक्चर व बिल्डर्स यांच्याकडे प्रॅक्टीस केली. त्यांचे लग्न इंजिनिअर असलेल्या अजित दिवटे यांच्यासोबत झाले. पुण्यासारख्या मेट्रोसिटीत अनेक मोठ्या प्रकल्पांचे काम करण्याचा अनुभव गाठीशी असताना त्यांनी साताºयात येऊन स्वत:चे आॅफिस सुरू केले. सुरुवातीला अनेकजण काम देण्यास नकार देत. कोट्यवधीचा बांधकाम प्रकल्प कमी वयाच्या एका महिला आर्किटेक्चरकडून करून घेण्यास अनेक बिल्डर्स तयार होत नव्हते. त्यासाठी त्यांना अनेक बिल्डरांचे उंबरठे झिजवावे लागले.
बांधकाम क्षेत्रात त्यांचा कोणीही गॉडफादर नसल्याने पहिले सहा महिने कोणीही काम देण्यास तयार नव्हते. त्यानंतर एका बिल्डरने इमारतीचे गेट व पार्किंगसारखी काम देण्यास सुुरुवात केली. हळूहळू त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्याकडे कामे वाढत गेली. त्याचवेळी पुण्यातील एका नामांकित बिल्डरने तामजाईनगरमध्ये ५५० फ्लॅटचा सर्वात मोठा प्रोजेक्ट लाँच केला. हा प्रकल्प हळूहळू साकार होत आहे. अनेक छोटी-मोठी घरे व इमारतीचे प्रकल्प हाती घेतले असून, ते प्रगतीपथाव आहेत.