बेघरवस्ती शाळेची माहिती पुस्तिका कौतुकास्पद : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:32 AM2021-01-09T04:32:03+5:302021-01-09T04:32:03+5:30
धामणेर : जिल्हा परिषदेच्या बेघरवस्ती (रहिमतपूर) येथील प्राथमिक शाळेची माहितीपुस्तिका व शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील ...
धामणेर : जिल्हा परिषदेच्या बेघरवस्ती (रहिमतपूर) येथील प्राथमिक शाळेची माहितीपुस्तिका व शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
बेघरवस्ती (रहिमतपूर) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेघरवस्ती, रहिमतपूरचे मुख्याध्यापक प्रवीण घाडगे यांनी शाळेची माहिती पुस्तिका देऊन शाळेत राबविण्यात येत असल्याचे नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी जयंत पाटील यांनी सध्याच्या कोरोना कालावधित शाळेत सुरू असलेल्या ऑनलाईन फोन व व्हाॅटस्-ॲपवरून शिक्षणाबद्दल माहिती घेतली व शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी नगराध्यक्ष आनंदा कोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर खवळे, सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे तज्ज्ञ सदस्य रूपेश जाधव, दीपक माने, रमेश घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.