विलासपूरकरांच्या वतीने आरोग्य देवदूतांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:02+5:302021-07-17T04:29:02+5:30
सातारा : ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने आणि कोविड१९ साथीचा मोठा प्रादुर्भाव असताना विलासपूर आणि परिसरातील नागरिकांना अविरतपणे सेवा देणाऱ्या ...
सातारा : ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने आणि कोविड१९ साथीचा मोठा प्रादुर्भाव असताना विलासपूर आणि परिसरातील नागरिकांना अविरतपणे सेवा देणाऱ्या रुग्णांना दिलासा देण्याचे काम करणाऱ्या विलासपूरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचा कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते ‘कोरोना योद्धा’ प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ. प्रसाद कदम, डॉ. अविना पाटील, डॉ. रश्मी दबडे, डॉ. महेश जाधव आणि विलासपूर आणि परिसरातील नागरिकांना लसीकरणासाठी बहुमोल सहकार्य केल्याबद्दल सातारा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जी. पवार, गोडोली आरोग्य केंद्राच्या डॉ. रसिका गोखले आणि कुमठे आरोग्य केंद्राचे डॉ. अमर शेलार, डॉ. जयपाल निकम, सुखदेव वायदंडे, एच. ए. मोरे (आरोग्य साहाय्यक), रेखा माळवे, मनीषा फाळके (आरोग्य सेविका), अंगणवाडी सेविका, मदतनीस या खऱ्या आरोग्यदूतांचा प्रातिनिधिक स्वरूपात सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि विलासपूर ग्रामस्थांच्या वतीने ‘विलासपूरचे कोरोना वॉरियर्स’ म्हणून सन्मान करण्यात आला.
या वेळी ज्येष्ठ काका पारेख, फिरोज पठाण, आशुतोष चव्हाण, आप्पा पिसाळ, उपसरपंच अभयराज जगताप, अमित महिपाल, सूर्यकांत नलावडे, नीलेश निकम, मनीषाताई काळोखे, मालतीताई साळुंखे, कनेरकर, काका बागल, महेश चव्हाण, श्रीराम राजमाने, अर्जुन पारखे, किरण भोसले, पाटील काका, निरंजन कदम, संकेत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. युवा कार्यकर्ते बाळासाहेब महामुलकर यांनी सर्वांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.
फोटो : ‘विलासपूरचे कोरोना वॉरियर्स’ म्हणून आरोग्यदूतांचा वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बाळासाहेब महामुलकर, डॉ. जयपाल निकम, सुखदेव वायदंडे आदी उपस्थित होते.