कमांडो ट्रेनिंगमध्ये वाघोशी गावच्या सुपुत्राचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:00+5:302021-06-30T04:25:00+5:30
खंडाळा : वाघोशी, ता. खंडाळा गावचे सुपुत्र दिलीप नामदेव धायगुडे यांना या वर्षाकरिता जलद प्रतिसाद पथक (कमांडो) मध्ये ...
खंडाळा : वाघोशी, ता. खंडाळा गावचे सुपुत्र दिलीप नामदेव धायगुडे
यांना या वर्षाकरिता जलद प्रतिसाद पथक (कमांडो) मध्ये प्रशंसनीय कामगिरी केल्यामुळे विशेष सेवा पदक व प्रशस्तीपत्र देऊन नुकताच सन्मान करण्यात आला.
खंडाळा तालुक्यातील वाघोशी गावचे दिलीप धायगुडे हे सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. वाकोला पोलीस ठाणे येथे १५ वर्षापासून पोलीस नाईक या पदावर कार्यरत आहेत.
२६/११ नंतर संपूर्ण महाराष्ट्रात शहरी भागात जलद प्रतिसाद पथक स्थापन करण्यात आल्या होते. यामध्ये मुंबई पोलीस दलातून त्यांनी सहा वर्षे अतिशय खडतर आणि प्रामाणिकपणे कमांडो कार्यकाळात उत्तम कामगिरी केल्यामुळे दि. २२ रोजी विशेष सेवादल पदक व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. खंडाळा तालुक्यात कमांडोमध्ये विशेष सेवादल पदक मिळविणारे दिलीप धायगुडे हे एकमेव आहेत. अतिशय खडतर परिस्थितीवर मात करून त्यांनी हे यश संपादन केल्याबद्दल वाघोशी व खंडाळा तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.