कचरा डेपोतील महिला कामगारांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:40 AM2021-02-11T04:40:24+5:302021-02-11T04:40:24+5:30

शहरातील इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रुपाली डांगे, सचिव सीमा पुरोहित व इतर महिला सदस्यांनी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची नुकतीच ...

Honoring women workers in waste depots | कचरा डेपोतील महिला कामगारांचा सन्मान

कचरा डेपोतील महिला कामगारांचा सन्मान

Next

शहरातील इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रुपाली डांगे, सचिव सीमा पुरोहित व इतर महिला सदस्यांनी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची नुकतीच भेट घेऊन एक वेगळी संकल्पना मांडली. कचरा डेपोत काम करणाऱ्या महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्षा शिंदे यांनीही या उपक्रमाला सहमती दर्शवित कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले.

शहरातून दररोज जमा होणारा ओला कचरा व सुका कचरा यावर वेगवेळ्या यंत्राद्वारे प्रक्रिया केली जाते. यातून खत निर्मिती, विद्युत निर्मिती व इतर अनेक गोष्टी तयार केल्या जातात. यातून कितीतरी कचरा वेचक महिलांच्या हाताला काम मिळाले असून या सर्वच बाबींची पाहणी करून या समाजातील दुर्लक्षित परंतु कचरा डेपोवर प्रत्यक्ष कष्ट करणाऱ्या महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे संबंधित महिलाही आनंदित झाल्या. नगराध्यक्षा शिंदे यांच्यासह इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी प्रत्यक्ष कचरा डेपोला भेट देत प्रकल्पावर काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला.

यावेळी नगरसेविका विद्या पावसकर, अंजली कुंभार, अनिता पवार, माया भोसले, पल्लवी पवार, सुनंदा शिंदे, कश्मिरा इंगवले, दीपाली दिवटे, गीता गायकवाड, अंजना कुंभार यांच्यासह प्रकल्पावर काम करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.

फोटो : १०केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाड पालिकेच्या कचरा डेपोत काम करणाऱ्या महिलांचा इनरव्हील क्लबकडून सन्मान करण्यात आला.

Web Title: Honoring women workers in waste depots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.