सातारच्या हद्दवाढीची वात पुन्हा पेटली
By Admin | Published: December 15, 2015 10:32 PM2015-12-15T22:32:20+5:302015-12-15T23:24:22+5:30
जिल्हा परिषदेत हालचाली : स्थायी समितीच्या निर्णयाकडे लक्ष
सातारा : सातारच्या हद्दवाढीची वात पुन्हा पेटली असून, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये हद्दवाढीचा मुद्दा मांडण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच सातारच्या हद्दवाढीवर शिक्कामोर्तब होणार आहे.सातारा शहरासह परिसरात वसाहतींचा वाढत चाललेला बकालपणा, वाढते अतिक्रमण, कचऱ्यांचे प्रश्न, सांडपाण्याचे अनियोजन, रस्त्यांची दुरवस्था, ओढ्यावर होत असलेले अतिक्रमण यामुळे विकासकामावर परिणाम होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून भविष्यातील सूनियोजित विकास आराखड्याला चालना देण्याच्या उद्देशाने ही हद्दवाढ महत्त्वाची आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा येत्या काही दिवसांत आहे. या सभेमध्ये हद्दवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. काही उपनगरांनी या हद्दवाढीला विरोध केला असला तरी प्रशासनाकडून याला मंजुरी मिळाल्यास विकासकामाला वेग येईल, असे जाणकार लोकांकडून बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या येत्या स्थायी समितीच्या सभेत गेल्या दोन वर्षांपासून स्थगित ठेवलेल्या हद्दवाढीच्या ठरावाला मंजुरी देण्यात येणार आहे.
- रवी साळुंखे,
(जिल्हा परिषद उपाध्यक्ष)