विवाह इच्छुकांचं घोडं अडलं; मध्यस्थांचा ‘भाव’ वधारला! पिता धायकुतीला ,पैशाशिवाय ‘बायोडाटा’ही पाहायला मिळेना-नवरी मिळेना नवऱ्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:45 PM2018-04-16T23:45:41+5:302018-04-16T23:45:41+5:30
कºहाड : मंडईत आपण दरासाठी घासाघीस करू शकतो; पण ‘बायोडाटा’च्या बाजारात ते चालत नाही. घासाघीस करणाºयाला तिथं किंमत नाही. आधीच घोडं अडलेलं, त्यात मध्यस्थांचा भाव वधारलेला.
संजय पाटील।
कºहाड : मंडईत आपण दरासाठी घासाघीस करू शकतो; पण ‘बायोडाटा’च्या बाजारात ते चालत नाही. घासाघीस करणाºयाला तिथं किंमत नाही. आधीच घोडं अडलेलं, त्यात मध्यस्थांचा भाव वधारलेला. त्यामुळे वराचा पिता फक्त ‘स्थळा’ची माहिती मिळवायला मध्यस्थाच्या खिशात पाचशेची नोट सरकावतो. नोटीशिवाय मध्यस्थी हालत नाही आणि नवºयाला नवरी नव्हे, साधा ‘बायोडाटा’ही पाहायला मिळत नाही.
जिथं तिथं सध्या लग्नाचा बाजार मांडला गेलाय. काही वर्षांपूर्वी पाहुण्यात पाहुणं होण्याची प्रथा होती. मुलगी नातेवाइकांच्या मुलाला देण्यास प्राधान्य दिले जायचे. मात्र, सध्या हा गोतावळा मागे पडत चाललाय. मुलगी पाहुण्यात नव्हे तर पाहुण्याच्या पाहुण्याला देण्यासही अपवाद वगळता कोणी उत्सुक नसल्याचे दिसते. त्यामुळे अपेक्षित स्थळ मिळण्यासाठी पालक मध्यस्थांच्या दारी हेलपाटे घालतायंत. काही वर्षांपूर्वी मध्यस्थांचे प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्याइतपत होते. त्यावेळी त्यांनाही म्हणावे तेवढे महत्त्व नव्हते. मात्र, सध्या मध्यस्थाशिवाय पान हालत नाही, अशी परिस्थिती आहे. मध्यस्थांच्या माध्यमातून विवाह ठरण्याचे प्रमाण वाढायला लागल्याने अनेकजण त्यांच्याकडे स्थळासाठी जातात. मात्र, मध्यस्थांचा हा वधारलेला भाव पाहून अनेकांनी काही संबंध नसताना या व्यवसायात शिरकाव केलाय.
विवाह जुळवून देणाºया अनेक नोंदणीकृत संस्था आहेत. या संस्थांमधून नियमानुसार फी आकारून विवाह जुळवून देण्याचे काम केले जाते. मात्र, या संस्थांव्यतिरिक्त अनेकांनी मध्यस्थीच्या नावाखाली लग्न जुळवून देण्याचा नवा बिनभांडवली व्यवसाय सुरू केलाय. या बिनभांडवली व्यवसायात ‘बायोडाटा’ला महत्त्व आहे आणि तोही मुलगा अथवा मुलीच्या वडिलांकडून त्यांना घरपोच केला जातो. नुसता ‘बायोडाटा’ देऊन चालत नाही तर त्यासोबत किमान पाचशेची नोट द्यावी लागते. पैसे मिळाले तरच हे मध्यस्थी ‘बायोडाटा’ पुढे सरकवतात. स्थळ सूचवतात. त्यासाठी वराच्या पित्याला संबंधित मध्यस्थाशी कायम संपर्कात राहावे लागते. वारंवार त्याला भेटावे लागते.
वर्षानुवर्षे विवाह जुळवून देण्याचे काम करणारे मध्यस्थी विश्वासाने हे काम पार पाडतात; पण फक्त पैसे कमविण्यासाठी मध्यस्थाची भूमिका पार पाडणारे विवाह ठरविण्याऐवजी पालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतायंत. पाचशे, हजार, दोन हजार अशी वारंवार पैशाची मागणी होते आणि विवाह रखडल्यामुळे मुलाचे पालक कसलाही विचार न करता संबंधिताचे खिसे गरम करतात..
अनेक मध्यस्थांचे प्रामाणिक प्रयत्न
अनेक मध्यस्थी विवाह जुळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे धडपड करतात. संकलित झालेल्या सर्व ‘बायोडाटा’तून अनुरूप ‘बायोडाटा’ मुलगी अथवा मुलाच्या पालकांना देतात. त्यांची बोलणी करून देतात. दोन्ही बाजूंची अपेक्षापूर्ती होत असेल तर पुढाकार घेऊन लग्नही जुळवून देतात. मात्र, मध्यस्थी करण्याच्या नावाखाली काहीजणांनी विवाह रखडलेल्यांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. अशा खोट्या मध्यस्थांमुळे प्रामाणिकपणे मध्यस्थी करणाºयांनाही त्याचा नाहक त्रास होतो.