‘कºहाड’कर ‘जनता’ बाबांच्या सत्कारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 11:03 PM2017-08-31T23:03:22+5:302017-08-31T23:03:22+5:30
प्रमोद सुकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावरील एका वारकºयाला पंढरपूर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदाच्या रुपाने चंद्रभागेतीरी काम करण्याची संधी मिळालीय. पदभार स्वीकारल्यापासून कºहाड तालुक्यात त्यांचे सत्कार सोहळे सुरू आहेत; पण विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली काम करणाºया येथील एका बँकेच्या दोन विद्यमान संचालकांनीच भाजपचे नेते असलेल्या अतुल भोसलेंचे सत्कार कार्यक्रम आयोजित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या नाहीत तर नवलच.
खरंतर यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कºहाडला राजकीय पंढरी म्हणून ओळखले जाते. याच पंढरीत राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणारे अनेक युवा नेते आहेत. पैकी एक म्हणजे भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले. काँगे्रसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात भाजपच्या वतीने लढण्याचे शिवधनुष्य डॉ. भोसलेंनी ऐनवेळी उचलले. पराभवाने खचून न जाता ते पक्षकार्यासाठी प्रयत्न करीत राहिले. त्याचीच पोचपावती म्हणून अगोदर पक्षाचे प्रदेश चिटणीसपद त्यानंतर पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्षपद त्यांना दिले. त्यामुळे भोसले समर्थकांच्या आनंदाला पारावार उरला
नाही.
महाराष्ट्रातील लाखो वारकºयांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद मिळाल्याने डॉ. अतुल भोसले यांचा अपवाद वगळता दररोज कुठे ना कुठे सत्कार कार्यक्रम होत आहेत. कºहाड दक्षिणेत तर त्यांचे कार्यकर्ते ‘एकसे बढकर एक’ असे देखणे कार्यक्रम करीत असून, माझ्या हातून पंढरपूरात नक्कीच सत्कार्य होईल, असा विश्वास अतुल भोसले सत्काराला उत्तर देताना देत आहेत.
या सगळ्या सत्कार सोहळ्यांत दोन सत्कार समारंभांची तालुक्यात मोठी चर्चा आहे.
ती म्हणजे राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली काम करणाºया कºहाड जनता सहकारी बँकेचे विद्यमान संचालक दिलीपभाऊ चव्हाण यांनी कºहाड येथे घेतलेल्या डॉ. अतुल भोसले यांच्या सत्काराची. तर दुसरे संचालक बबनराव शिंदे यांच्या हस्ते विंग येथे झालेल्या भोसले यांच्या सत्काराची.
गत विधानसभा निवडणुकीत जनता उद्योग समूहाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता. आता त्याच बँकेचे संचालक भाजपच्या बाबांचा सत्कार करताहेत म्हटल्यावर चर्चा तर होणारच.
डॉक्टर कोणता इलाज करणार?
पंढरपूर विकासातील अनेक आजारांवर इलाज करण्यासाठी देवस्थान विकासाची श्वेतपत्रिका काढणार असल्याचे डॉ. भोसले यांनी यापूर्वीच जाहीर केलयं; पण फडणवीसांनी केलेल्या निवडीवर काही ‘फड’करी नाराज आहेत. त्यात काही ‘कºहाडकरां’चाही समावेश आहे. या नाराजीवर हे कºहाडकर डॉक्टर कोणता इलाज काढणार, हे पाहावे लागेल.
मठाधिपतींनीही केला सत्कार
कºहाडच्या डॉ. अतुल भोसले यांच्या पंढरपूर देवस्थान समिती अध्यक्षपदाच्या निवडीला दस्तुरखुद्द वारकरी संघटनेचे बंडा तात्या कºहाडकरांनी कडाडून विरोध केलाय. सध्या ते शाब्दिक ‘वार’ करीत आहेत. मात्र, दुसरीकडे कºहाडकरांचे श्रद्धास्थान असणाºया कºहाडकर मठाचे मठाधिपती बाजीराव मामा कºहाडकर यांच्या हस्ते डॉ. भोसले यांचा अनेक ठिकाणी सत्कार होत आहे. त्यामुळे दस्तुरखुद्द वारकरी मंडळी बुचकळ्यात पडल्याचे पाहायला मिळत आहेत.