संकटकाळातील पाहुणचार माणुसकीचा पाठ घालणारा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:37 AM2021-04-11T04:37:42+5:302021-04-11T04:37:42+5:30

कोरोनाचे संकट गेल्या एक वर्षापासून आहे. दररोज हजारो नवीन रुग्णांची नोंद होत आहे. यामधील बहुतांश रुग्ण हे प्रशासनाने सुरू ...

Hospitality in times of crisis teaches humanity ... | संकटकाळातील पाहुणचार माणुसकीचा पाठ घालणारा...

संकटकाळातील पाहुणचार माणुसकीचा पाठ घालणारा...

Next

कोरोनाचे संकट गेल्या एक वर्षापासून आहे. दररोज हजारो नवीन रुग्णांची नोंद होत आहे. यामधील बहुतांश रुग्ण हे प्रशासनाने सुरू केलेल्या रुग्णालय, कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेतात, तर काहीजण हे गृह विलगीकरणात असतात. गृह विलगीकरण म्हणजे तेथे फक्त बाधितच राहतात. कुटुंबातील व्यक्ती त्यांच्यापासून दूर राहतात. अशा काळात गृह विलगीकरणातील बाधितांना धीर देणे महत्त्वाचे ठरते. कारण, आतापर्यंतचे आजार हे रुग्णांपर्यंत माणसाला घेऊन जात होते, पण कोरोना आजार हा माणसाला माणसापासून दूर ठेवतो. त्यामुळे बाधितांना धीर देणे महत्त्वाचे ठरते.

अशा गृह विलगीकरणातील बाधित व्यक्तींशी संपर्क साधणे, आजाराबाबत धीर देणे, त्यांच्या अडीअडचणी पाहणे व त्यासाठी मदत करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आपण बाधितांना एखादं औषध लागलं तर देऊ शकतो. कारण, या आजारात माणसाला कधी औषधांची गरज लागेल ते सांगता येत नाही. अशावेळी माणुसीच्या नात्याने आपणाला हे करावे लागते. अशा काळातील मदत ही आयुष्यभरासाठी अनमोल ठरणारी असते. कारण, आजारी माणसापासून दूर राहूनही आपली मदत होत असते. त्यामुळे माणसातील माणुसकी जागविण्याचेच काम होत असते. तसेच रुग्णांसाठीही हा एक प्रकारचा पाहुणचारच ठरतो.

चौकट :

कोरोना संकटात अप्रत्यक्ष मदतही...

कोरोनाकाळात बाधितांना जागेवर मदत करता येते; पण दूर राहूनही अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करता येते, हेही कोरोनाच्या संकटाने दाखवून दिले आहे. आपल्या ओळखीने एखाद्या कोरोना रुग्णांना बेड मिळवून देणे, मित्रांना सांगून बांधितांपर्यंत औषधे पोहोचविणे, त्यांच्या अडचणी सोडविणे शक्य होते. त्यामुळे ओळखीतूनच आपणाला अप्रत्यक्षरीत्या मदत करता येते, अशा प्रकारचा पाहुणचारही कोरोनाने शिकवला आहे.

- नितीन काळेल

....................................................

Web Title: Hospitality in times of crisis teaches humanity ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.