रुग्णालयांना ‘जनआरोग्य’चे वावडे; चार टक्के रुग्णांनाच मोफत उपचार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:41+5:302021-05-18T04:40:41+5:30

सातारा : महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये सहा हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले; परंतु बहुतांश रुग्णांना अजून ...

Hospitals to ‘public health’; Free treatment for only 4% of patients! | रुग्णालयांना ‘जनआरोग्य’चे वावडे; चार टक्के रुग्णांनाच मोफत उपचार !

रुग्णालयांना ‘जनआरोग्य’चे वावडे; चार टक्के रुग्णांनाच मोफत उपचार !

Next

सातारा : महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये सहा हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले; परंतु बहुतांश रुग्णांना अजून पैसे मिळाले नाहीत आणि उपचारासाठी जर सव्वा लाख रुपयांचा खर्च आला तर मिळाले केवळ वीस हजार रुपये, अशी परिस्थिती असून, रुग्णालयांना जनआरोग्यचे वावडे केवळ चार टक्के रुग्णांवर मोफत उपचार असे चित्र आहे.

गोरगरीब रुग्णांना रुग्णालयाचा खर्च परवडत नाही. शासकीय रुग्णालयांमध्ये बेडची व्यवस्था नसल्याने अनेकांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागले. शासनाने या खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना चालू केली असल्याने या ठिकाणी उपचारांचे सर्व पैसे मिळून जातील, असे लोकांना वाटत होते; परंतु रुग्णालयांनी लाखोंची बिले वसूल केली, तरी हा रुग्णांच्या नातेवाइकांना अजून रुपयाचाही परतावा मिळालेला नाही. वास्तविक, लाख रुपयांचे बिल असताना केवळ वीस हजार रुपयेच शासन देत असल्याने गरीब रुग्णांचे हाल झाले. अनेकांनी हा दुसरे पैसे घेऊन, तसेच कर्ज काढून कोणी कोणी जमीन विकूनसुद्धा पैसे उभे केले आणि दवाखान्याची बिले भरलेली आहेत. शासनाने या रुग्णांना संपूर्ण मोफत उपचार करणे अपेक्षित होते; पण तसे का गेले नाही, असा सवाल हे रुग्ण विचारत आहेत.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी जोडलेली जिल्ह्यातील रुग्णालये - २५

एकूण कोरोनाबाधित - १,३६,६६८

कोरोनामुक्त - १,११,२०७

मृत्यू - ३१८५

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण -२१५०६

योजनेचा लाभ घेतलेले रुग्ण - ६०००

२) केवळ २० हजारांचे पॅकेज (बॉक्स)

या योजनेंतर्गत उपचारासाठी केवळ २० हजारांचे पॅकेज असल्याने रुग्णालयांकडून टाळाटाळ केली जात आहे. एवढ्या पैशात रुग्णाच्या टेस्ट होतात, बाकीचा खर्च रुग्णाच्या खिशातून करावा लागतो आहे. या योजनेतून जास्तीत जास्त ४० हजार रुपये मिळू शकतात.

३) अशी करा नोंदणी (बॉक्स)

या योजनेशी संलग्न असलेले रुग्णालयात आरोग्य मित्रांमार्फत नोंदणी करता येते. कागदपत्रे जवळ नसतील तरी उपचार सुरू करून नंतर कागदपत्रे देता येतात. आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड आणि रेशन कार्ड या दोन्ही कागदपत्रांना बरोबर ठेवावे लागणार आहे.

४) ... तर करा तक्रार (बॉक्स)

रुग्णालयांनी योजनेंतर्गत उपचार नाकारल्यास जिल्ह्याधिकारी कार्यालय, जिल्हाशल्य चिकीत्सक किंवा जिल्हा समन्वयाकडे तक्रारी करता येतात. आतापर्यंत ५२ तक्रारी आल्या होत्या त्यापैकी २९ तक्रारींचा जिल्हा प्रशासनाने निपटारा केला आहे.

५) शेती विका, व्याजाने पैसे काढा, पण पैसे भरा

कोट

महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कुठली कुठली रुग्णालय आहेत त्यापैकी कोरोनासाठी जे रुग्णालय घेतले आहेत त्याची माहिती नेमक्या पद्धतीने मिळत नाही. एकतर ज्या ठिकाणी मोफत उपचार होतात ती रुग्णालय आधीच फुल होती. त्यामुळे खासगी ठिकाणी उपचार घेतले, पण आता जमीन विकायची वेळ आलेली आहे.

- सदाशिव पवार

कोट

जिल्ह्यात मोजकीच रुग्णालये करण्यासाठी प्रशासनाने घेतलेली आहेत. रुग्णाला ॲडमिट करतेवेळी आमच्याजवळ आधार कार्ड आणि रेशनिंग कार्ड नव्हते. हात उसने पैसे घेऊन रुग्णालयाचे सव्वा लाख रुपये बिल झाले. आता शासन केवळ वीस हजार रुपये देणार आहे. गेल्या वर्षापासून पैसे कधी मिळणार याची आम्हाला प्रतीक्षा आहे.

- त्रिंबक साळुंखे

Web Title: Hospitals to ‘public health’; Free treatment for only 4% of patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.