हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिक हतबल । पर्यटन क्षेत्राला १६ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:24 PM2020-05-24T17:24:13+5:302020-05-24T17:29:05+5:30

दत्ता यादव। सातारा : पर्यटनाचा महामेरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला यंदा कोरानामुळे सुमारे १६ कोटींचा फटका बसलाय. हॉटेल, ...

Hotel, restaurant professional handball. | हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिक हतबल । पर्यटन क्षेत्राला १६ कोटींचा फटका

हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिक हतबल । पर्यटन क्षेत्राला १६ कोटींचा फटका

googlenewsNext
ठळक मुद्दे ऐन हंगामात उलाढाल ‘लॉक’

दत्ता यादव।
सातारा : पर्यटनाचा महामेरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला यंदा कोरानामुळे सुमारे १६ कोटींचा फटका बसलाय. हॉटेल, रेस्टॉरंट, तीर्थक्षेत्रांची उलाढाल ठप्प झालीय. ऐन हंगामात केवळ चाळीस दिवसांत वर्षभराची कमाई करणारे व्यावसायिक यंदा स्वकमाई करून बसलेत. त्यामुळे येणारा काळ व्यवसायासाठी कसा असेल, याची चिंता अनेकांना लागलीय.
जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोली ही जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाची पर्यटनक्षेत्र आहेत. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये या ठिकाणी भेटी देणा-या पर्यटकांची संख्या लाखोंने असते.

त्यामुळे साहजिकच स्थानिक नागरिकांना रोजगार तर उपलब्ध होतोच; पण व्यवसायाचे नवनवीन मार्ग तयार होत असतात. त्यामुळे यातून मोठी कमाई होत असते. महाबळेश्वर अन् पाचगणीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओढा सर्वाधिक असतो; परंतु सध्या कोरोनामुळे सर्वच व्यवसाय लॉकडाऊन झाल्यामुळे दिग्गज व्यावसायिकही मेटाकुटीला आलेत. कोरोनाच्या लाटेत, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह सर्वचजण भुईसपाट झालेत. कास, बामणोली परिसरातही आता उत्कृष्ट धाटणीची हॉटेलस् रेस्टॉरंट उभारलीत. कर्ज घेऊन या व्यवसायात उतरलेल्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय.


कोरोनाच्या तोंडावर ७२ हॉटेल्स सुरू
सातारा जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याने अनेक उद्योन्मुख व्यावसायिकांनी हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या व्यवसायात पर्दापण केले. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी जिल्ह्यात ७२ नवे हॉटेल्स सुरू झाली. अनेकांनी कर्ज घेऊन या व्यवसायात उडी घेतली. मात्र, आठ-दहा दिवस हॉटेल सुरू होऊन गेले असतानाच सातारा जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री झाली. त्यामुळे संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन झाला.

आज, उद्या लॉकडाऊन शिथील होईल, अशा आशेवर असणाऱ्या नव्या व्यावसायिकांची निराशाच झाली. हॉटेलचे भाडे, डिपॉझिट, कामगार अशा सर्वांचाच भार नव्या व्यावसायिकांवर आला. आता या व्यावसायिकांना खरी गरज आहे ती, आर्थिक हातभाराची.



अ‍ॅडव्हान्स पगार..
दरवर्षी हंगामात काही वेळाला कामगार मिळत
नाहीत. त्यामुळे कामगारांना टिकवून ठेवण्यासाठी अगोदरच उचल द्यावी लागते. आम्ही कामगारांना दोन महिन्यांचा पगार अ‍ॅडव्हान्समध्ये दिला असल्याचे व्यावसायिक यशवंत ढेबे यांनी सांगितले.


हॉटेल्सचे वाढते प्रमाण
जिल्ह्यात २ हजार १५६ हॉटेल्स् तर ४५८ रेस्टॉरंट आहेत. यातील काहींनी परवाना घेतलाय तर काहींनी नोंदणी केली आहे.


कर्ज कसं फेडणार..
मार्च महिन्यांमध्ये मी हॉटेल सुरू केले. या व्यवसायात येण्यापूर्वी मी पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये नोकरी केली. पोटाला चिमटा देऊन पै-पै जमा केला. स्वत:चं हॉटेल सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलंही. परंतु कोरोनाने माझी निराशा केलीय.
-संजय देशमाने, सातारा.

 

Web Title: Hotel, restaurant professional handball.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.