अनेक गावे हॉटस्पॉट... नऊ गावांत जनता कर्फ्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:39 AM2021-04-27T04:39:21+5:302021-04-27T04:39:21+5:30
तालुक्यात सध्या दीड हजार कोरोनाबाधित आहेत. त्यातील बाराशे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. कोरोनाचा वाढता वेग धोकादायक असून, सर्वांनी ...
तालुक्यात सध्या दीड हजार कोरोनाबाधित आहेत. त्यातील बाराशे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. कोरोनाचा वाढता वेग धोकादायक असून, सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. घरीच थांबून कोरोना संसर्गाची साखळी तोडणे महत्त्वाचे आहे.
माण तालुक्यातील गावनिहाय बाधित रुग्ण संख्या अशी : म्हसवड २९८, दहिवडी ११३, नरवणे ७४, बिदाल ६३, लोधावडे ५७, पळशी ४८, गोंदवले खुर्द ४६, पानवन ३७, मोही ३५, खडकी ३०, मलवडी २८, गोंदवले बुद्रुक २९, थदाले २३, पुकळेवाडी २०, विरळी १८, बनगरवाडी १९, वावरहिरे १७, सोकासन १७, वर-म्हसवड १६, दीवड १४, धुलदेव १४, परकंदी १३, पांगरी १२, भालवडी १२, शिरवली १२, वारुगड ११, बोडके ११, शिंदी बुद्रुक ११, मंकर्नवाडी ११, कोळेवाडी १०, पर्यंती १०, उकिरडे ९, तोंडले ८, कुलकजाई ८, बिजवडी ८, खुटबाब ८, इंजबाव ८, पांढरवाडी, किरकसाल ८, वळई ७, पिंगळी बुद्रुक ७, मोगराळे ७, वरकुटे-मलवडी, आंधळी, काळेवाडी, वडगाव प्रत्येकी ६ सत्रेवाडी, दानवलेवाडी, जाशी, कारखेल, हिंगणी, हवालदारवाडी, पिंपरी, शेनवडी प्रत्येकी ५ बाधीत. देवापूर, दिवडी, शेवरी, जाधववाडी, शिंदी खुर्द, राजवडी, येथे प्रत्येकी ४ बाधित. भाटकी, अनभुलेवाडी प्रत्येकी ३ बाधित. भांडवली, दोरगेवाडी, पिंगळी खुर्द, पळसावडे, गांगोती प्रत्येकी दोन बाधी महिमानगड, वाघमोडेवाडी, स्वरूपखानवाडी, रांजणी, गटेवाडी,श्रीपालवन, बोथे येथे प्रत्येकी एक बाधित निघाला आहे.
चौकट :
२९ हजार नागरिकांना लसीकरण
माण तालुक्यात सध्या १,५०० पेक्षा जास्त रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. गेल्या वर्षभरात माण तालुक्यातील ९६ गावात ५ हजार ७३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४ हजार ०९४ रुग्ण बरे झाले आहेत.१५९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या तालुक्यात एक हजार पाचशेहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर माण तालुक्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येथे मिळून आत्तापर्यंत २९ हजार नागरिकांना लसीकरण केले आहे.