कास पठारावर दीड तास पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:35 AM2021-04-14T04:35:17+5:302021-04-14T04:35:17+5:30
सातारा : शहराच्या पश्चिमेस कास पठाराच्या राजमार्गाकडील डोंगरमाथ्यावरील सोमवारी सायंकाळी काही भागात दीड तास जोरदार पाऊस पडला. दरम्यान, ...
सातारा : शहराच्या पश्चिमेस कास पठाराच्या राजमार्गाकडील डोंगरमाथ्यावरील सोमवारी सायंकाळी काही भागात दीड तास जोरदार पाऊस पडला. दरम्यान, या परिसरात चार वाजल्यापासून उन्हाळी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली होती.
गत काही दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढतच चालला असून, दोन दिवसांपूर्वी यवतेश्वर ते अंबानी परिसरात झालेला गारांचा पाऊस, पश्चिमेस यवतेश्वर ते कास परिसरात सर्वत्र मध्यम स्वरूपात पडलेला पाऊस व सलग तिसऱ्या दिवशी कास पठार परिसराच्या डोंगरमाथ्यावरील कुसुंबीमुरा, गेळदरे भागात तुरळक तर सांगवीमुरा, सह्याद्रीनगर आदी काही भागात तासभर जोरदार पाऊस झाला. यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण होण्यास मदत झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला.
फोटो : १३ पेट्री
सांगवीमुरा, ता. जावळी येथे सोमवारी सायंकाळी तासभर पडलेल्या पावसात भिजण्याचा आनंद घेताना चिमुकला.