सातार्यात बंद घरांवर डल्ला तीन ठिकाणी घरफोडी : पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
By Admin | Published: May 19, 2014 12:12 AM2014-05-19T00:12:52+5:302014-05-19T00:13:42+5:30
सातारा : शहर व परिसरात विविध तीन ठिकाणी चोरट्यांनी बंद घरे फोडून तब्बल पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सातारा : शहर व परिसरात विविध तीन ठिकाणी चोरट्यांनी बंद घरे फोडून तब्बल पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अक्षय सदाशिव माने (रा. सदर बझार, सातारा) हे १५ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांसमवेत बाहेर गेले होते. एका तासानंतर ते परत आले. त्यावेळी त्यांच्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. बनावट चावीने कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. कपाटातील तब्बल १२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. त्यामध्ये मंगळसूत्र, सोन्याच्या दोन चेन, ब्रेसलेट, बांगड्यांचा समावेश आहे. दुसरी घटना येथील गडकरआळीमध्ये घडली. अर्जुन रघुनाथ चाळके यांचे घर गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. चाळके कुटुंबीय बाहेरगावी गेले आहेत. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून २३ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. शेजार्यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चाळके कुटुंबाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर चाळके कुटुंबाने घराकडे धाव घेतली. तिसरी घटना यादोगोपाळ पेठेत घडली. घरातील सुमारे २५ हजारांचा ऐवज चोरीस गेला. (प्रतिनिधी)