सातारकरांना गाढव म्हणणारे सक्षम कसे?

By admin | Published: November 16, 2016 12:14 AM2016-11-16T00:14:00+5:302016-11-16T00:14:00+5:30

आडमुठेपणा राजकारणात तरी काही उपयोगाचा नाही

How to enable Satarkar to call a donkey? | सातारकरांना गाढव म्हणणारे सक्षम कसे?

सातारकरांना गाढव म्हणणारे सक्षम कसे?

Next

सातारा : ‘प्रचंड एकाधिकारशाही, मीच म्हणेन ते योग्य आणि तेच खरे असा अतिमहत्त्वाकांक्षी आणि आडमुठेपणा राजकारणात तरी काही उपयोगाचा नाही. स्वत:ला सक्षम समजत असलेल्या व्यक्तींनी, काही दिवसांपूर्वीच कचरा टाकणाऱ्या व्यक्तींना गाढव म्हणून संबोधले होते. तथापि, नागरिकांना गाढव म्हणणारे किती सक्षम आहेत आणि किती हुशार आहेत, हे सर्व समाजाला यानिमित्ताने समजले, हे फार चांगले घडले.’ असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला.
सातारा विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवी संजोग कदम आणि प्रभाग क्रमांक १ मधील सातारा विकास आघाडीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीत नागरिकांशी सुसंवाद साधताना आणि सातारा विकास आघाडीची भूमिका स्पष्ट करताना ते बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, ‘यंदाच्या नगराध्यक्ष निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडला जाणार आहे, असा लोकनियुक्त नगराध्यक्ष सक्षम पाहिजेच. तथापि, अशी व्यक्ती राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या सत्तेच्या विकेंद्रीकरण तत्त्वानुसार सत्तास्थानी आली पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तींच्या जोरावर लोकप्रतिनिधींची आणि संस्थांची अनेक पदे भूषवित असलेल्या काही व्यक्ती मात्र, ज्यावेळी सर्वसामान्य पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस अशा सर्वसामान्यांचा कठपुतळी आणि अकार्यक्षम म्हणून उल्लेख करतात हे कुणाला पटणारे नाही.सर्वसामान्य जनतेच्या, व्यक्तींच्या जोरावर शिखरावर आपण जायचे आणि दुसरा कोणी जावयास निघाला तर त्याचा कठपुतळी म्हणून उपमर्द करायचा ही प्रवृत्ती म्हणजे लोकशाहीचे एकप्रकारे विडंबन आहे. लोकशाहीचे असे विडंबन करणाऱ्यांना सातारकर झिडकारून टाकतील.
ते म्हणाले, ‘सध्या मीच कशी सक्षम आहे, मीच कशी कार्यक्षम आहे, अशी उर बडवून सांगण्याची अहमीकाच सातारा शहराच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत संबंधित उमेदवारांकडून सुरू आहे. एखादा उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील आहे का याचे आत्मपरीक्षण सर्वच उमेदवारांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
.. ही तर सातारकर महिला वर्गाची अवहेलना
‘उमेदवार असलेल्या सर्वसामान्य महिला म्हणजे कठपुतळी असे देखील काही व्यक्ती म्हणत आहेत. ज्या व्यक्तीवर पूर्ण नियंत्रण असते, अशा नियंत्रीत व्यक्तीला कठपुतळी म्हटले जाते. आता साताऱ्यात काय महाराष्ट्रात आणि देशात कठपुतळी व्यक्ती आढळणार नाही. दुसऱ्या उमेदवार व्यक्तीला कठपुतळी संबोधून तुम्ही मात्र समस्त सातारकर महिला वर्गाचा अपमान आणि अवहेलना करीत आहात, याचे प्रायश्चित्त तुम्हाला समस्त महिला भगिनी देतील. तथापि, सर्वसामान्य मतदार देखील योग्य वेळी धडा शिकवेल,’ असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: How to enable Satarkar to call a donkey?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.