डॉक्टर लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:38+5:302021-04-10T04:38:38+5:30
सातारा : मद्यपान केल्यानंतर एनर्जी येते असा काही जणांचा अनुभव आहे. मात्र ही एनर्जी फार काळ टिकणार नाही तर ...
सातारा : मद्यपान केल्यानंतर एनर्जी येते असा काही जणांचा अनुभव आहे. मात्र ही एनर्जी फार काळ टिकणार नाही तर सातत्याने मद्यपान करणाऱ्या व्यक्तीचे लिव्हर खराब होते आणि भविष्यामध्ये कुठलेही लसीकरण केले तरी त्याचा फायदा होण्याऐवजी त्या व्यक्तीला तोटाच होणार असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा दुसरा डोस दिला जात आहे. लसीकरण आधी आणि नंतर मद्यप्राशन करायचे का? यावर अनेक मतप्रवाह दिसतात. याबाबत लोकमतने तज्ज्ञांची मते जाणून घेतली. जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेत सहभागी होण्याआधी अनेक मद्यपींना प्रश्न पडले आहेत. मद्यप्राशन करून लसीकरण केल्यास किंवा लसीकरणानंतरमध्ये प्राशन केल्यास कोणता धोका होऊ शकतो का? असे प्रश्न त्यांच्या मनात आहेत. मात्र याबाबत तज्ज्ञांची मते जाणून घेतली असता लसीकरणानंतर किंवा लसीकरण आधी कुठल्याही वेळी मद्यप्राशन करणे हे धोकादायक आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एकूणच ज्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, अशा व्यक्तीला बरे करताना मोठ्या अडचणी येतात, त्यामुळे व्यसनापासून दूर राहिलेलेच बरे...असे मत व्यक्त केले जात आहे.
साताऱ्यात मार्च महिन्यामध्ये झालेली दारूविक्री (लीटरमध्ये)
देशी दारू : १० लाख ९१ हजार २१०
विदेशी दारू : ५ लाख ५० हजार ८५६
बियर : ४ लाख ५३ हजार ५००
वाईन : १२ हजार ८२४
कोट
मद्यपानामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी येत असते. सध्याच्या काळामध्ये प्रोटिन, विटामिनची गरज आहे. ड्रिंकमधून या प्रकारचे कुठलाही फायदा मिळत नाही. त्यामुळे लसीकरण करण्याआधी अथवा केल्यानंतर ड्रिंक करूच नये.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये
जिल्हा आरोग्य अधिकारी
कोट
लसीकरण दरम्यान मद्यपानाच्या संदर्भाने शासनाच्या कोणतेही गाईडलाईन्स नाहीत. मात्र तरीदेखील मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते तसेच लस घेतल्यानंतर जर काही त्रास झाला तर ती व्यक्ती नशेत काही सांगू शकत नाही, हा धोका होऊ शकतो.
डॉ. ज्ञानेश्वर हिरास
कोट...
जी व्यक्ती सातत्याने मद्यपान करत असते त्याचे कालांतराने लिव्हर खराब झालेला असतो, त्यामुळे जितके वर्ष मद्यप्राशन केले आहे, तितके वर्ष धोका अधिक असतो, अशा व्यक्तीला नक्की त्रास होऊ शकतो.
- डॉ. चंद्रशेखर जाधव