आल्या किती, दिल्या किती, संपल्या भरारा...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:39 AM2021-05-13T04:39:16+5:302021-05-13T04:39:16+5:30

कऱ्हाड : कोरोना लसीबाबत निर्माण झालेला गोंधळ कमी होताना दिसत नाही. शहरातील विविध केंद्रांवर नागरिक रांगा लावतायत. मात्र, नंबर ...

How much has come, how much has been given, how much has been spent ...? | आल्या किती, दिल्या किती, संपल्या भरारा...?

आल्या किती, दिल्या किती, संपल्या भरारा...?

Next

कऱ्हाड : कोरोना लसीबाबत निर्माण झालेला गोंधळ कमी होताना दिसत नाही. शहरातील विविध केंद्रांवर नागरिक रांगा लावतायत. मात्र, नंबर येईपर्यंत लस संपल्याचे त्यांना सांगीतले जातेय. परिणामी, अनेकांच्या रागाचा पारा चढत असून, आरोप-प्रत्यारोप केले जातायत. लस आल्या किती, दिल्या किती आणि लगेच संपल्या कशा, असा प्रश्नच आता नागरिक उपस्थित करत आहेत.

कऱ्हाड शहरासह तालुक्यात कोरोना लसीकरण सुरू आहे. उपलब्धतेनुसार विविध केंद्रांवर लस वितरित केली जात असून, या विभागणीत एका-एका केंद्राला दररोज ठरावीकच साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे गावोगावच्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यातच अठरा वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येत असल्यामुळे केंद्रांवर झुंबड उडत असल्याचे दिसून येते.

शहरातील केंद्रांवर तर नागरिक सकाळपासून रांगा लावत आहेत. लस उपलब्ध झाल्याचे समजताच नागरिक थेट केंद्रावर हजेरी लाऊन रांगेत उभे राहत आहेत. त्यामुळे या रांगा केंद्राबाहेर रस्त्यापर्यंत गेल्याचे दिसून येते. नंबर येण्याच्या प्रतीक्षेत नागरिक तासन् तास उभे राहतात. मात्र, काही वेळातच लस संपल्याचे संबंधित केंद्रातून सांगीतले जाते. त्यामुळे रांगेत थांबलेल्यांचा पारा चढत असून, वादावादीच्या घटना घडत आहेत. शहरासह तालुक्यात मंगळवारपर्यंत लसीचे १ लाख २० हजार डोस उपलब्ध झाले आहेत. शहरातील विविध केंद्रांसह गावोगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्या-त्या वेळी हे डोस वितरित करण्यात आले आहेत.

- चौकट

लोकसंख्या : ५,८७,४११

मिळालेली लस : १,२०,०००

झालेले लसीकरण : १,११,८४६

शिल्लक लस : ८,१५४

- चौकट

लोकसंख्येच्या तुलनेत...

झालेले लसिकरण : १९.०४%

लसीच्या प्रतीक्षेत : ८०.९६%

- चौकट

कऱ्हाड तालुक्यात...

उपजिल्हा रुग्णालय - १

ग्रामीण रुग्णालय - १

प्राथमिक आरोग्य केंद्र - ११

आरोग्य उपकेंद्र - ६४

नागरी आरोग्य केंद्र - १

- चौकट

असे करण्यात आले लसीकरण

लाभार्थी : पहिला डोस : दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी : ९,३३७ : ५,१७६

फ्रंटलाइन वर्कर्स : ६,६३७ : २,७७५

१८ ते ४४ वर्ष : २०११ : ५

४५ ते ६० वर्ष : ३९१२२ : ३२८४

६० वर्षांपुढील : ३८,२९८ : ५,२०१

एकूण लसीकरण : ९५,४०५ : १६,४४१

- चौकट

लसिकरणाचा लेखाजोखा

हेळगाव : ४,००५

इंदोली : ५,६७९

काले : ८,५९०

कोळे : ५,५९९

मसूर : ५,४५८

रेठरे : ४,७९५

सदाशिवगड : ५,५६८

सुपने : ५,०५२

उंब्रज : ६,९२५

वडगाव हवेली : ५,१४८

येवती : ४,०२१

- चौकट

रुग्णालयनिहाय डोस

नागरी केंद्र : ६,६००

कॉटेज : १७,४५५

सह्याद्री : ३,०००

गुजर : १,९२५

कृष्णा : ८,५२६

कऱ्हाड हॉ. : १,१८६

शारदा : ४,४४९

श्री : १,१६५

कोळेकर : १,५१७

सिटी : ३९८

सिद्धीविनायक : ७२२

फोटो : १२केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाडला लसीकरण केंद्रावर लसीसाठी दररोज नागरिकांची मोठी रांग लागलेली असते. ‘मेरा नंबर कब आयेगा,’ असे म्हणण्याची वेळ रांगेतल्या नागरिकांवर येते.

Web Title: How much has come, how much has been given, how much has been spent ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.