हुमणीन कुरतडलं; भुंग्यान पोखरलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 04:07 PM2017-08-24T16:07:33+5:302017-08-24T16:13:00+5:30

ढेबेवाडी (जि. सातारा) : चक्रीभुंग्यानं कुरतडलं आणि हुमणीनं पोखरल्यामुळे ढेबेवाडी विभागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पिकावरील किडीला थोपविण्याचे आव्हान समोर असतानाच कृषी अधिकारीच गायब झाल्याने या अधिकायांनाº शोधण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. 

Humanian Kurtadla; Fleece! | हुमणीन कुरतडलं; भुंग्यान पोखरलं!

हुमणीन कुरतडलं; भुंग्यान पोखरलं!

Next
ठळक मुद्देभुईमुगासह सोयाबीनची मुळे पोखरल्याने पिकाची नासधुस ढेबेवाडी विभागातील शेतकरी हतबलपिकावरील किडीला थोपविण्याचे आव्हान कृषी अधिकारीच गायब, अधिकायांनाº शोधण्याची वेळ शेतकरी कोमात पंपवाले जोमात!

ढेबेवाडी (जि. सातारा) : चक्रीभुंग्यानं कुरतडलं आणि हुमणीनं पोखरल्यामुळे ढेबेवाडी विभागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पिकावरील किडीला थोपविण्याचे आव्हान समोर असतानाच कृषी अधिकारीच गायब झाल्याने या अधिकायांनाº शोधण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. 


ढेबेवाडी विभागात पिकायोग्य पाऊस पडल्याने विभागातील शेतकºयांत समाधानाचे वातावरण होते. खरीप हंगाम यशस्वी होणार म्हणून खुशीत असलेल्या शेतकºयांच्या आनंदावर अखेर चक्री भुंगा, मावा आणि हुमणीनं विरजन टाकल.

भुईमुगासह सोयाबीन पीकांची मुळे पोखरल्याने हिरवीगार पिके लगेचच कोमेजून जात आहेत.  तर यावर्षी माव्याच्या जोडीलाच चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव वाढल्याने हायब्रीडसह इतर कडधान्याच्या पिकांची पाने नाहीशी झाली आहेत.

वास्तविक, या विभागातील शेतकरी खरीपावरच अवलंबून असतो. समाधानकारक पाउस झाल्याने भरभरून धान्य निघेल, या आशेवर असणाºया शेतकºयांची सध्या निराशा झाली आहे. भुंगे, हुमणी, किडे आदींचा प्रतिकार करताना तारेवरची कसरत करणाºया शेतकºयाला कोणी वाली आहे, का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या विभागातील कृषी अधिकारी गत अनेक महिन्यांपासून विभागात फिरकलेले नाहीत. त्यामुळे मार्गदर्शन घ्यायचे कुणाचे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. 

पंपाला शंभर....आठ दिवसांनी नंबर !


शेतात किटकनाशक फवारणी करणारे काही ठराविक मजूर आहेत. शेतकरी या मजुरांमार्फत शेतात फवारणी करतात. शेतकºयांनी किटकनाशक आणि पाणी पुरवठा करायचा. मग १५ लिटरच्या एका पंपाची फवारणी करून द्यायला मजुर शंभर रूपये घेतात. त्यासाठीही कमीत कमी आठ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकºयांच्या अडचणीत भरच पडत आहे .

शेतकरी कोमात पंपवाले जोमात!

किडीचा प्रादुर्भाव आणि हिंस्त्र प्राण्यांकडून होणाºया नुकसानीमुळे शेतकरी कोमात जरी गेला असला तरी पंपवाला मजूर मात्र भलताच जोमात आहे. दिवसभरात सुमारे २५ ते ३० पंप फवारणी करून सुमारे अडीच ते तीन हजाराची दररोज कमाई तो करत आहे.

 कृषी अधिकाºयांचा भरवसा हाय काय?

या विभागातील कृषी विभाग कुठे आहे, याचा शेतकºयांना थांगपत्ताच नाही. येथील अधिकारी, कर्मचाºयांनी शेतकºयांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केल्याचे कधी ऐकीवात नाही. तर शेतकरी दुरध्वनीवरून येणाºया कृषी संदेशानुसारच फवारणी करतात, असेही काही शेतकºयांनी सांगीतले. 

 

Web Title: Humanian Kurtadla; Fleece!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.