कोरोना महामारीत रयत परिवाराने जपली माणुसकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:39 AM2021-05-13T04:39:10+5:302021-05-13T04:39:10+5:30
कराड: रोजंदारीवरील सेवकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून या सेवकांच्या पाठीशी रयत शिक्षण संस्था ठामपणे उभी आहे हे दाखवून दिले ...
कराड: रोजंदारीवरील सेवकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून या सेवकांच्या पाठीशी रयत शिक्षण संस्था ठामपणे उभी आहे हे दाखवून दिले आहे. या माध्यमातून महाविद्यालय व रयत परिवाराने माणुसकी जपली आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य ॲड. रवींद्र पवार यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६१व्या स्मृतिदिनानिमित्त सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय व कराड येथील रयत संकुलात रोजंदारीवर काम करणाऱ्या सेवकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अॅड रवींद्र पवार यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने,ॲड. सदानंद चिंगळे, किसनराव पाटील, सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, रयत बँकेचे अध्यक्ष पोपटराव पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी महाविद्यालयातील कर्मवीरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ.
मोहन राजमाने, ॲड. सदानंद चिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. रोजंदारीवर काम करणाऱ्या १५०वर सेवकांना यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यालयीन प्रमुख आर. वाय. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य एस. ए. पाटील यांनी आभार मानले.
फोटो
कराड येथे रयत शिक्षण संस्थेत रोजंदारीवर काम करणाऱ्या सेवकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना ॲड. रवींद्र पवार, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, सदानंद चिंगळे आदी.