माणुसकी हरली कोवळी मने हेलावली!

By admin | Published: September 3, 2015 10:14 PM2015-09-03T22:14:36+5:302015-09-03T22:14:36+5:30

नागरिक बघ्याच्या भूमिकेत : अपघातातील जखमीला केली नववी, दहावीच्या मुलांनी मदत

Humanity wanders in mind! | माणुसकी हरली कोवळी मने हेलावली!

माणुसकी हरली कोवळी मने हेलावली!

Next

सातारा : बऱ्याचदा अपघात झाल्यानंतर त्सुकतेपोटी नागरिक खमीभोवती गराडा घालत असतात; पण जखमीला वेळेत रुग्णालयात नेण्यासाठी कोणीही पुढे येत नसते, हे आपण अनेकदा पाहात असतो. परंतु एकीकडे समाजाची संवेदना बोथट होत चालली असताना दुसरीकडे मात्र सदर बझारमधील कोवळ्या मुलांनी जखमीला मदत करून जीवनदान दिले. रक्तबंबाळ झालेल्या जखमीला पाहून या कोवळ्या मुलांची मने हेलावली. मात्र, जाणत्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतल्याने येथे माणुसकी हरल्याचे पाहायला मिळाले.
अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण अलीकडे प्रचंड वाढले आहे. काही अपघात चालकांच्या चुकीमुळे तर काही अपघात ओबडधोबड असलेल्या रस्त्यांमुळे होत असतात. अपघातामध्ये जखमी होणाऱ्याला तत्काळ मदत मिळाल्यास त्याचा जीव वाचतो; परंतु जखमीला वेळेत मदत मिळत नसल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अपघातानंतर जखमींच्याभोवती केवळ गराडा घालून ‘फोटोसेशन’ केले जाते; परंतु त्याला मदत करण्यास कोणी पुढे धजावत नाही.
काहीजण पोलिसांची कटकट नको तर काहीजण आपल्याला काय करायचाय, या मानसिकतेत असतात.मात्र या सगळ्या जर तर ला सदर बझारमधील नववी, दहावीतील चार कोवळी मुले याला अपवाद ठरल.
किरण चंद्रकांत जगदाळे (वय १५), सौरभ प्रताप खरात (१४), देवेश महेश नलावडे (१४), अथर्व संजय दिवेकर (१४) ही मुले बुधवारी सायंकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे क्लासला निघाली होती. भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीजवळून ही मुले चालत जात असताना समोर चालेल्या एका सायकलस्वाराला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, सायकलस्वार पाच ते दहा फूट उडून रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्यातून आणि हाता-पायातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्याचवेळी तेथून बरेच नागरिक चालत, तर काहीजण कार, दुचाकीवरून जात होते. हे सर्वजण त्या जखमीभोवती थांबले; परंतु त्याला मदत करण्यासाठी कोणी पुढे आले नाही.
सुमारे दहा मिनिटे तो जखमी रस्त्यावर विवळत पडला होता. याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या या कोवळ्या मुलांनी त्या जखमीला उठवून उभे केले. दप्तराच्या कप्प्यात अडकविलेली वॉटर बॅग काढून त्याला पाणी पाजले. त्यानंतर त्यांनी १०८ ला फोन करून रुग्णावाहिकाही बोलावली. या मुलांची ही गडबड सुरू असताना जाणती माणसं मात्र बघ्याच्या भूमिकेत होती. (प्रतिनिधी)

कोवळ्या मुलांचा आदर्श घ्या !

जखमींना वेळेत मदत मिळाली तर शंभर टक्के त्यांचा जीव वाचतो. यासंदर्भात शासनाकडून जनजागृती केली जात आहे. परंतु अद्यापही लोकांमध्ये संवेदना जाग्या झाल्या नाहीत. या कोवळ्यामुलांनी एक जीव वाचवून कुटुंबाचा आधारवड जपला. हाच आदर्श इतरांनीही घ्यावा.

Web Title: Humanity wanders in mind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.