Lok Sabha Election 2019 माणूस संसदेत पाठवायचाय, टोलनाक्यावर नव्हे: मदन भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:11 PM2019-04-11T23:11:07+5:302019-04-11T23:11:28+5:30
वाई : ‘आम्ही राजेंवर टीका करणार नाही ते माझे मित्र आहेत; परंतु ही लोकसभेची निवडणूक संसदेत माणूस पाठविण्यासाठीची असून, ...
वाई : ‘आम्ही राजेंवर टीका करणार नाही ते माझे मित्र आहेत; परंतु ही लोकसभेची निवडणूक संसदेत माणूस पाठविण्यासाठीची असून, टोल नाक्यावर पाठवायचा नाही. आता घाबरण्याचे दिवस संपले आहेत. आमचा उपयोग करून घ्या; पण आमच्या चार पावले पुढे तुम्ही राहिले पाहिजे. आमचे परतीचे दोर केव्हाच कापले आहेत. आम्हाला भविष्याची चिंता नाही,’ असा हल्लाबोल किसन वीर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार मदन भोसले यांनी केला.
सातारा येथील औद्योगिक वसाहतीत उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, अविनाश फरांदे, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश शिंदे, तालुकाध्यक्ष अनिल शेंडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन घाटगे, महिला जिल्हाप्रमुख शारदाताई जाधव, महाबळेश्वर नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, रोहिदास पिसाळ, नंदकुमार खामकर, वाई अर्बन बँकेचे चेअरमन चंद्र्रकांत काळे उपस्थित होते.
चरेगावकर म्हणाले, ‘भाजपाचा धसका घेतल्यानेच विरोधक एकत्र आले आहेत. शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. सांगलीच्या मत्रपत्रिकेतून काँग्रेसचे चिन्ह गायब झाले. त्यांना उमेदवार मिळत नाहीत आणि हे देश चालविण्याची स्वप्ने पाहतात. काँग्रेसचा स्वत:चे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. शेतीतील जाणकार समजणाऱ्यांनी साखर उद्योग वाचविण्यासाठी इथेनॉल प्रकल्प का आणले नाहीत, साखरेस व शेत मालाला हमीभाव का दिला नाही? याची उत्तरे द्यावीत. यांच्या काळात दहा वर्षे शेतमालाला हमीभाव देणारा स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट दाबून ठेवला. याचं उत्तर विरोधकांनी द्यायलाच हवं.’
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, यशवंत लेले, महेश शिंदे, हणमंतराव वाघ, मंगेश खंडागळे, दिलीप वाडकर, अजित वनारसे, संतोष कोळेकर, अविनाश फरांदे, शारदाताई जाधव, काशिनाथ शेलार, यशवंत घाडगे, अनुप सूर्यवंशी आदींनी मनोगते व्यक्त केली. यामुळे नेत्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.