खरशिंगेच्या सरपंचपदी नम्रता सुतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:13 AM2021-03-04T05:13:13+5:302021-03-04T05:13:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औंध : खटाव तालुक्यातील खरशिंगे येथील सरपंचपदी नम्रता गजानन सुतार यांची तर उपसरपंचपदी दिनकर भगवान शिंगाडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : खटाव तालुक्यातील खरशिंगे येथील सरपंचपदी नम्रता गजानन सुतार यांची तर उपसरपंचपदी दिनकर भगवान शिंगाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जयभवानी विकास परिवर्तन पॅनलने गेल्या पस्तीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे.
खरशिंगे ग्रामपंचायतीवर पॅनलप्रमुख दिनकर शिंगाडे यांनी एकहाती सत्ता खेचून आणली. या निवडीकामी सदस्य लक्ष्मण मदने, आशा घार्गे, स्वाती सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. निवडणूक निर्णय अधिकारी एस. डी. खाडे यांनी काम पाहिले, तर ग्रामसेवक एस. आर. देशमुख यांनी त्यांना सहकार्य केले.
निवडीनंतर बोलताना नूतन सरपंच नम्रता सुतार म्हणाल्या की, गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. सर्वांना बरोबर घेऊन विकासकामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपसरपंच दिनकर शिंगाडे म्हणाले, ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वास सार्थ करून दाखविणार आहे. शासकीय योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचे यावेळी रामचंद्र पाटील, जंगल घार्गे, विकास कदम, व्यंकट घार्गे, आप्पासाहेब घार्गे, किसन घार्गे, बबन शिंदे, नारायण घार्गे, पांडुरंग घार्गे, मिलिंद रणदिवे, दिनेश रणदिवे, सोपान घार्गे, दत्तात्रय घार्गे, अमोल घार्गे, सिद्धध घार्गे, आनंदा घार्गे, सिद्धध रणदिवे, धनाजी माळी, संभाजी मदने आदींसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
फोटो : ०२ खरशिंगे
खरशिंगे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नम्रता सुतार, उपसरपंचपदी दिनकर शिंगाडे यांची निवड झाल्यानंतर ग्रामस्थांनी जल्लोष केला.(छाया : रशिद शेख)