आगाशिव शेकडो दिव्यांनी उजळला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 04:10 PM2017-10-09T16:10:55+5:302017-10-09T16:13:33+5:30
हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आगाशिव डोंगरावरील शिवशंकर मंदिरात शेकडो मावळ्यांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराच्या गाभाºयासह परिसर शेकडो दिव्यांनी उजळला.
मलकापूर, जि. सातारा,9 : हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आगाशिव डोंगरावरील शिवशंकर मंदिरात शेकडो मावळ्यांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराच्या गाभाºयासह परिसर शेकडो दिव्यांनी उजळला.
हिंदू एकता अंदोलनच्या वतीने यावर्षी आगाशिव डोंगरावर दीपोत्सव साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू एकता आंदोलन व भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व राहुल यादव यांच्यासह शेकडो युवकांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता.
जखिणवाडी येथून विक्रम पावसकर यांच्या हस्ते मशाल पेटवून आगाशिव डोंगर चढण्यास प्रारंभ झाला. शेकडो युवकांचे ग्रुप या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी दाखल होत होते. भगवे ध्वज, जय भवानी जय शिवाजी , हर हर महादेव अशा घोषणा देत युवकांनी डोंगर सर केला.
यावेळी रात्रीच्या शांत वेळेत घोषणामुळे डोंगर परिसर दणाणून गेला. डोंगरावरील शिवमंदिर व बिरोबा मंदिरामध्ये विक्रम पावसकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शेकडो युवकांनी मंदिराच्या गाभाºयासह परिसरात शेकडो दिवे लावले. आगाशिवनाथ मंदिर परिसर दिव्यांनी तेजोमय झाला होता. हा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनीही उपस्थिती लावली होती.
यावेळी विक्रम पावसकर, दिग्वीजय मोरे, गणेश महामुनी, संग्राम पवार यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीत दीपोत्सवासाठी जमलेल्या युवकांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर विचारमंथन केले. तसेच हिंदू राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली.