साताऱ्यात तब्बल दीडशे इमारती धोकादायक !
By admin | Published: June 8, 2017 11:18 PM2017-06-08T23:18:19+5:302017-06-08T23:18:19+5:30
साताऱ्यात तब्बल दीडशे इमारती धोकादायक !
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा नगरपालिकेने पावसाळापूर्वी शहरातील इमारतींचा सर्व्हे केला असून त्यामध्ये तब्बल दीडशे इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. पालिकेने संबंधित घरमालकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत.
शहराच्या विविध भागात असणाऱ्या धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता गृहीत धरुन मिळकतधारकान्ाां नोटीस पाठविण्यात आल्या आहेत़ धोकेदायक इमारत स्वत: उतरुन घ्यावे यासाठी आव्हान करण्यात आले आहे़ सातारा शहरात जवळपास दीडशे जुन्या इमारती व वाडे असल्याचे आढळून आले आहे. जुन्या व कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या इमारतीमुळे भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. या धोकादायक इमारतीमुळे शहरातील नागरी जीवन ही टांगणीला लागल्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक धोकादायक इमारतीमध्ये नागरिक राहत असल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे़ त्यातच घरमालक व भाडेकरु यांचा वाद न्यायालयात असल्याने घरमालकांना इमारत पाडता येत नसल्याचे कारण घरमालकाकडून पालिकेला देण्यात येत आहे. इमारतीचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने इमारती कोणी पाडावयाच्या हा प्रश्न निर्माण होत आहे़
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यानी नुकतीच आपत्कालीन व्यवस्थेसंदर्भात नियोजन भवनात जिल्हयातील सर्व शासकीय अधिकारी व त्यांच्या विभागाची बैठक घेतली़ पावसाळ्यापूर्वी व त्यानंतर शहरातील विविध भागात उद्भविणाऱ्या परिस्थितीबाबत विविध विषयावर मंथन झाले़ नागरिकांच्या आरोग्य तसेच सुरक्षितेला सर्वात प्राधान्यक्रम देणाचा निर्धार या बैठकीत करण्यात आला़ त्यानुसार जिल्हयातील सर्व शासकिय विभागाने आपआपल्या कार्यक्षेत्रातील कार्यप्रणालीचे नियोजन हाती घेतले़ पावसाळयात निर्माण होणारे धोके अधिक असल्याने प्रशासनाने तयारी केली आहे.