शंभर किलो फुलांच्या पायघड्या !

By admin | Published: October 14, 2015 10:02 PM2015-10-14T22:02:04+5:302015-10-15T00:23:48+5:30

नव्या नगराध्यक्षांसाठी अनोखे स्वागत : साताऱ्याच्या यंग ब्रिगेडने केली होती जय्यत तयारी

Hundreds of flowers! | शंभर किलो फुलांच्या पायघड्या !

शंभर किलो फुलांच्या पायघड्या !

Next

सातारा : पालिकेच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच नूतन नगराध्यक्ष विजय बडेकर यांचे त्यांच्या समर्थकांनी शाही पद्धतीने स्वागत केले. नगराध्यक्षांचे दालन आणि ज्या सभागृहात निवड झाली. त्या सभागृहापासून ते पालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत सगळीकडेच फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. हा आगळावेगळा सोहळा पालिकेतील कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच अनुभवता आला. सुमारे १०० किलो फुलांच्या या पायघड्या होत्या. सातारा पालिकेमध्ये मनोमिलनाची सत्ता असल्याने दोन्ही आघाड्यांतून आपापल्या नगरसेवकांना पदे दिली जातात. काम करण्यास किती कालावधी मिळाला, यापेक्षा पद मिळालं, हे एखाद्या सर्वसामान्य नगरसेवकासाठी महत्त्वचं असतं. सातारा पालिकेमध्ये आजपर्यंत ४५ नगराध्यक्षहून गेले. पूर्वी पाच वर्षांचा काळ नगराध्यक्ष पूर्ण करत होते; परंतु मनोमिलनाची सत्ता २००६ रोजी आल्यानंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाचा सव्वा वर्षासाठी कार्यकाळ वाटून घेण्यात आला. मनोमिलनाच्या कालावधीत आत्तापर्यंत १२ जणांनी नगराध्यक्षपद भूषविले. सातारासारख्या ऐतिहासिक शहराचे नगराध्यक्षपद होणे हे अभिमानाची बाब आहे. त्यामुळे या पदासाठी नेहमीच रस्सीखेच होत असते. नगराध्यक्षपद मिळाल्यानंतर अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने जल्लोष करतात; परंतु नूतन नगराध्यक्ष बडेकर यांचे ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. ती पद्धत आत्तापर्यंत अवलंबली नव्हती. (प्रतिनिधी)


पालिका झाली गुलालमय...
नगराध्यक्षपदी विजय बडेकर तर उपनगराध्यक्षपदी जयवंत भोसले यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालिकेत प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीमध्ये विशेषत: तरुण मुले दिसत होती. बडेकर यांच्या स्वागतासाठी या मुलांनी शंभर किलो फुले आणली. संपूर्ण पालिकेमध्ये या फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. तितकाच गुलालही होता. गुलालाची उधळण केल्यामुळे पालिका गुलालमय झाली होती. नूतन नगराध्यक्षांचे हे आगळेवेगळे स्वागत पाहण्यासाठी सातारकरांनीही गर्दी केली होती. उपगनराध्यक्ष जयवंत भोसले यांच्या समर्थकांमध्येही यंग ब्रिगेडचा जत्था मोठा होता. उपनगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जयवंत भोसले यांना त्यांच्या दालनापासून ते गाडी ज्या ठिकाणी उभी होती तिथंपर्यंत खांद्यावर उचलून कार्यकर्त्यांनी नेले. इतका उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होता.

खुर्चीवरून उठायचं नाही : उदयनराजे
विजय बडेकर यांनी पद्भार स्वीकारल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी ‘आता खुर्चीवर बसलात उठायचं नाही,’ असा सल्ला देत १९९१ च्या पालिका निवडणुकीची आठवण काढली. ते म्हणाले, ‘मी पालिकेत निवडून आलो, त्यावेळी विरोधात सहा नगरसेवक होते. तुम्ही आता नशीबवान आहात.’

Web Title: Hundreds of flowers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.