रस्ता तेरा किलोमीटरचा अन खड्डे शेकडो !
By admin | Published: July 15, 2017 01:55 PM2017-07-15T13:55:13+5:302017-07-15T13:55:13+5:30
मायणी-म्हसवड रस्त्याची दुरवस्था : दोन्ही तालुक्यांत रस्त्याच्या कामात दुजाभाव
आॅनलाईन लोकमत
मायणी (जि. सातारा), दि. १५ : खटाव तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या मायणी-म्हसवड मागार्ची खड्ड्यामुळे चाळण झाली असून, या मार्गावर असणाऱ्या चारही फरशी पुलाची खड्ड्यामुळे बिकट अवस्था झाली आहे. मायणी-म्हसवड रस्ता तेरा किलोमीरटचा अन खड्डे शेकडो, अशी स्थिती या रस्त्याची झाली आहे.
मायणी-म्हसवड हे सुमारे ३५ किलोमीटरचे अंतर आहे. या मधील १३ किलोमीटरचा मार्ग खटाव तालुक्याच्या हद्दीत येतो तर उर्वरित अंतर हे माण तालुक्यात येत आहे.
या मार्गावरील कानकत्रे, पडळ, हिवरवाडी, कण्हरवाडी, ढोकलवाडी, मानेवाडी, कुकुडवाड आदी गावांचा रोज या ना त्या कारणासाठी मायणीशी संपर्क येत असतो, तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना माध्यमिक, उच्च माध्यामिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी याच मार्गावरून ये-जा करावी लागते.