सूर्यनमस्कार स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग
By admin | Published: December 18, 2014 09:15 PM2014-12-18T21:15:59+5:302014-12-19T00:31:55+5:30
मुलींची आघाडी
मलकापूर : येथील मळाईदेवी शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून सुर्यनमस्कार स्पर्धांचे आयोजन केले होते़ वयोगटानुसार ७ गटात अयोजित संस्थांतर्गत स्पर्धेत बालवाडी ते महाविद्यालयातील ९५० विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला होता़
संस्थेचे सचिव अशोकराव थोरात यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला़ यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भस्करराव पाटील, प्राचार्य आऱ आऱ पाटील, जे़ एऩ कराळे, एस़ एस़ शिंदे, शरद तांबवेकर, सुरेश शिंदे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते़
यावेळी अशोकराव थोरात म्हणाले, विद्यार्थ्यांना बालपणातच व्यायामाची आवड निर्माण झाली, तर ती चिरकाळ टिकते, या वयात विद्यार्थ्यांनी दोनशेहून अधिक सुर्यनमस्कार घातले हे कौतुक आहे़ उद्याचे नागरिक आरोग्यपूर्ण घडविण्यासाठी अशा स्पर्धांचे वारंवार आयोजन करावे़ या स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना आहार, योगाविषयी पुस्तीका व प्रशस्तीपत्रक देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सुत्रसंचालन शरद तांबवेकर यांनी केले तर सुरेश शिंदे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)
मुलींची आघाडी
मलकापूरात मळाईदेवी शिक्षण संस्थेने संस्थांतर्गत सुर्यनमस्कार स्पर्धांचे अयोजन केले होते़ स्पर्धेस प्रारंभ झाल्यानंतर काही वेळाने थकल्यामुळे मुलांची संख्या हळूहळू कमी होत गेली; मात्र मुलींनी दोनशे पेक्षा जास्त सुर्यनमस्कार घालून काही गटात आघाडी मिळवली़