गाव पाणीदार होण्यासाठी राबतात हजारो हात !

By admin | Published: April 20, 2017 12:37 PM2017-04-20T12:37:20+5:302017-04-20T12:37:20+5:30

खटावमध्ये आशादायी चित्र : वॉटरकपसाठी राजापूर, डिस्कळ, रणशिंगवाडी अन पांगरखेल गावांत मोठी चुरस

Hundreds of thousands of hands to make the village watery! | गाव पाणीदार होण्यासाठी राबतात हजारो हात !

गाव पाणीदार होण्यासाठी राबतात हजारो हात !

Next

आॅनलाईन लोकमत

बुध (जि. सातारा), दि. २0 : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारी गावे पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने एकत्र आल्याचे समाधानकारक चित्र खटाव तालुक्याच्या उत्तर भागात पाहायला मिळत आहे़

रणशिंगवाडी, राजापूर, डिस्कळ, पांगरखेल या गावांना वेध लागले आहेत ते आपले गाव पाणीदार बनवण्याचे़ त्यासाठी गावातील सर्वजण हातात फावडे आणि टिकाव घेऊन कामाला लागले आहेत.़ आपल्या गावाला बक्षिस मिळवुन गावातील शिवारात पाणी खेळावे यासाठी हजारो हात राबत असल्याचे आशादायक चित्र पाणी चळवळीला पाठबळ देत आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्ष, गटात-तटात विभागलेली जनता वॉटर कप स्पर्धेच्या माध्यामातून जलसंधारणच्या कामासाठी एकाच झेंड्याखाली आली आहे़ भल्या पहाटे हातात टिकाव आणि फावडे, घमेली घेऊन श्रमदानासाठी मोठी गर्दी होत आहे.़ तरूणांबरोबर, ज्येष्ठ नागरिक, महिला श्रमदानात आघाडीवर असतनाही अशावेळी श्रमदान करण्याऱ्यांना पाणी देण्यासाठी बालगोपाळही सरसावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे़

दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्याने तरूणांचाही लक्षणिय सहभाग वाढत आहे. गावातील मुंबई, पुण्यातील चाकरमन्यांकडून या कामासाठी लागणारे टिकाव, फावडे, घमेली पुरवण्यात आल्याने कामाला चांगलीच गती मिळाली आहे.़ रणशिंगवाडी, पांगरेखेल, डिस्कळ, राजापूर या गावात एकीचे बळ पाहायला मिळत आहे.

जवळजवळ लागून असलेल्या या गावामध्ये बक्षिस मिळवण्यासाठी मोठी चुरस लागली असून कोण बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे. गावातील प्रमुख युवा कार्यकर्ते दररोज श्रमदान करणाऱ्यांची यादी तयार करत असून त्या पध्दतीने नियोजन होत आहे़. पुण्या-मुंबईमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांचेही चांगले योगदान लाभत असल्याचे अशादायक चित्र पाहायला मिळत आहे. (वार्ताहर)

जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढला...

डिस्कळ, पांगरखेलमधील अनेक जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असून त्याचबरोबर सीसीटीचेही काम मोठ्या प्रमाणत करण्यात आले आहे़ पांगरखेलमधील श्रमदानामध्ये बुध व परिसरातील नागरिकांचा मोठा सहभाग आहे. पंचायत समितीचे उपसभापती कैलास घाडगे, माजी सरपंच ज्ञानेश्वर जगताप यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला. तर डिस्कळमधील पन्नास ते साठ तरूण दररोज श्रमदान करत आहेत. त्यांच्या कामाला सहकार्य करण्यासाठी ग्रामंपयातीने पुढाकर घेतल्यास मोठी चळवळ उभी राहणार आहे.

ओढ्याच्या खोलीकरणाचे काम...

या स्पर्धत पहिल्या दिवसापासून अगे्रसर असलेली रणशिंगवाडी आणि राजापूर याठिकाणच्या ओढ्यांचे खोलीकरण करणे, मातीबांध घालणे आदी कामे अगदी जलत गतीने केल्याचे पाहायला मिळत आहे़ या कामांमुळे राजापूर आणि रणशिंगवाडी गावामध्ये तरूणांचा एकोपा पहायला मिळत असल्याचे चित्र दिसत आहे़

Web Title: Hundreds of thousands of hands to make the village watery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.