अवैध दारूवर उंब्रज पोलिसांचे शंभरवर छापे : साडेआठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 05:31 PM2020-11-09T17:31:41+5:302020-11-09T17:33:36+5:30
liquerban, umbraj, police, sataranews अवैध दारूविक्रीविरुद्ध उंब्रज पोलिसांनी मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी १०१ अड्ड्यांवर छापे टाकले असून, आरोपींना अटक करून तब्बल ८ लाख ८७ हजार १३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उंब्रज : अवैध दारूविक्रीविरुद्ध उंब्रज पोलिसांनी मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी १०१ अड्ड्यांवर छापे टाकले असून, आरोपींना अटक करून तब्बल ८ लाख ८७ हजार १३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उंब्रज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावात बेकायदेशीर दारूविक्री होऊ द्यायची नाही, असा चंग उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी बांधला आहे. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीर दारू व्यवसायावर छापे टाकण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. गत दहा महिन्यांत उंब्रज पोलिसांनी १०१ ठिकाणी छापे टाकून अड्डे उद्ध्वस्त केले आहे. तसेच दारूविक्री करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावामधील ग्रामस्थांनी आपल्या परिसरात अवैद्य दारूची विक्री होत असेल तसेच जुगार व इतर अवैद्य धंदे सुरू असतील तर त्याची माहिती उंब्रज पोलीस ठाण्याला तातडीने द्यावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे.