कोरोनाला हरविण्यासाठी शेकडो योद्धे आदेशाच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 12:42 PM2020-04-17T12:42:01+5:302020-04-17T12:42:43+5:30

कोरोनामुळे संकटात सापडलेल्या लोकांना विविध स्वरुपात मदत केली जात आहे. कोणी आर्थिक मदत तर कोणी अन्न धान्य, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करीत आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्यात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही बाधित होत आहेत.

Hundreds of warriors await order to defeat Corona! | कोरोनाला हरविण्यासाठी शेकडो योद्धे आदेशाच्या प्रतीक्षेत !

कोरोनाला हरविण्यासाठी शेकडो योद्धे आदेशाच्या प्रतीक्षेत !

Next
ठळक मुद्देलढा व्यापक : डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तज्ज्ञ यांचा समावेश

स्वप्नील शिंदे
सातारा : कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्याविरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम केलेल्या व सेवानिवृत्त असलेल्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. यात राज्यातील २१ हजार योद्धांनी सहभाग नोंदवला असून, सातारा जिल्ह्यातील शेकडो लोकांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्र यांचा समावेश आहे.

कोरोनामुळे संकटात सापडलेल्या लोकांना विविध स्वरुपात मदत केली जात आहे. कोणी आर्थिक मदत तर कोणी अन्न धान्य, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करीत आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्यात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही बाधित होत आहेत. त्यामुळे कोरोनाविरुद्धचा लढा आता अधिक व्यापक झाला आहे. या व्यापक लढ्यात वैद्यकीय क्षेत्रात काम केलेल्या मात्र आता सेवानिवृत्त असलेल्या नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. अशी सेवा देणाऱ्या नागरिकांना ह्यकोविड योद्धाह्ण म्हणून ओळखले जाणार आहे. कोविड योद्धा होऊ इच्छिणा-या नागरिकांना सरकारशी संपर्क करता यावा, यासाठी एक ईमेल आयडीही दिला आहे.

कोविड योद्धा होऊ इच्छिणाºया नागरिकांनी या ईमेल आयडीवर सरकारशी संपर्क साधला. पद, मानधन, अथवा वेतन याबाबत अद्याप कोणतीही निश्चिती नसताना अनेकांनी स्वयंस्फूर्तीने कोरोना विरुद्धच्या लढ्यात स्वत:ला झोकून देण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

साता-यातील शेकडो डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, शिक्षक आणि माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांचा समावेश आहे. विशेष गोष्ट अशी आहे की, लोक संकटकाळात मदत देतात अशा लोकांमध्ये केवळ सेवानिवृत्तच नाही तर तरुण, नोकरदार आणि व्यावसायिक असलेले लोकही आहेत. लोक आपत्तीच्यावेळी कोरोनाशी लढाई करण्यासाठी आपली कामे आणि सुविधा सोडत आहेत. या स्वयंसेवकांमध्ये साता-याचे डॉ. रवींद्र झुटिंग-भारती, प्रा. डॉ. शर्मिला मोरे, डॉ. राजेंद्र माने, माजी सैनिक संजय ढाणे यांचा समावेश आहे.


सध्या कोरोना संसर्गाचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १०० माजी सैनिकांनी स्वत:हून संकटाच्या वेळी काम करण्याची इच्छा दर्शवली. तशी मागणी जिल्हा सैनिक बोर्डाकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. बँक आॅफ महाराष्ट्रने सोशल डिस्टन्सिंगचे नियमांचे पालन करण्यासाठी माजी सैनिकांची मागणी केली होती. त्यानुसार ७० सैनिकांनी सेवा पुरवली आहे.
-कमांडर विजयकुमार पाटील,
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा

Web Title: Hundreds of warriors await order to defeat Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.