तौक्ते चक्रीवादळाने वीज गायब; फळबागांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:41 AM2021-05-18T04:41:10+5:302021-05-18T04:41:10+5:30
वाठार स्टेशन : अरबी समुद्रात घोंघावणारे तौक्ते चक्रीवादळ अधिक सक्रिय झाले आहे. या चक्रीवादळाचा फटका पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. ...
वाठार स्टेशन : अरबी समुद्रात घोंघावणारे तौक्ते चक्रीवादळ अधिक सक्रिय झाले आहे. या चक्रीवादळाचा फटका पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक गावात गेली ४८ तासांपासून वीज गायब झाली आहे. कोरेगाव तालुक्यातील फळबागा विशेषतः आंबा, टोमॅटो पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सोसाट्याचा वारा व अधूनमधूम पावसाची रिमझिम सुरु असल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. वाऱ्यामुळे आंबा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय वीज गायब झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत वारे शांत होत नाहीत तोपर्यंत वीज सुरळीत होणार नाही, अशी माहिती महावितरणकडून दिली जात असल्याने अजून किती तास वीज येण्याची प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.