ऊस वाहतूक ट्रॅक्टर-पिकअपची जोरदार धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 17:00 IST2017-10-31T16:55:02+5:302017-10-31T17:00:30+5:30
महाड-पंढरपूर मार्गावर विडणी, ता. फलटण येथे मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ऊस वाहतूक ट्रॅक्टर व पिकअपची जोरदार धडक होऊन एक जण जखमी झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन वाहनांची जोरदार धडक झाली.

ऊस वाहतूक ट्रॅक्टर-पिकअपची जोरदार धडक
फलटण : महाड-पंढरपूर मार्गावर विडणी, ता. फलटण येथे मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ऊस वाहतूक ट्रॅक्टर व पिकअपची जोरदार धडक होऊन एक जण जखमी झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी पहाटेच्या सुमारास विडणी येथे उपळवे येथील साखर कारखान्याला ऊस घालून ट्रॅक्टर (एमएच ४५ एफ २४०४) पुन्हा माळशिरसकडे जात होता.
फलटणहून अकलूजकडे पिकअप (एमएच एएफ ४६०१) जात होती. या दोन वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रॅक्टरचालक संजय सदाशिव राऊत (रा. माळशिरस) हे किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.