...अखेर चिऊ परतलीच नाही!

By admin | Published: December 22, 2014 12:07 AM2014-12-22T00:07:02+5:302014-12-22T00:07:54+5:30

गायत्री जमदाडे मृत्यू प्रकरण : नीरा-उजवा कालव्यात सात दिवसांनी मृतदेह सापडला

I did not return! | ...अखेर चिऊ परतलीच नाही!

...अखेर चिऊ परतलीच नाही!

Next

शिरवळ : रविवार... शाळेला सुटी... अहिरे येथील चिऊ (गायत्री) मैत्रिणींबरोबर खेळण्यात दंग... मैत्रिणीच्या घरून स्वत:च्या अंगणात खेळायला आलेली चिऊ अचानक गायब... सर्वत्र शोधाशोध... पण, अखेर चिऊ परतलीच नाही.
...अन् टिंकू श्वान जागेवरच घुटमळले, ही परिस्थिती आहे वाठार कॉलनी ाावच्या हद्दीतील नीरा-उजवा कालव्यात आढळलेल्या सहा वर्षीय बालिकेच्या मृतदेहाजवळील. चिऊ ऊर्फ गायत्री संतोष जमदाडे (वय ६, रा. अहिरे, ता. खंडाळा) असे दुर्देवी मृत बालिकेचे नाव आहे.
वाठार कॉलनी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत असणाऱ्या वीर धरणाजवळील नीरा उजवा कालव्यावरील पुलापासून शंभर ते दीडशे मीटरवर कालव्यामध्ये बारदाण्याच्या पोत्यामध्ये अज्ञात मुलीचा मृतदेह आढळून आला. ही घटना वाठार बुद्रुक येथील रहिवासी दीपक सुरेश तारू हे कॅनॉलच्या रस्त्याने मोटारसायकलवरून घरी निघाले असताना कॅनॉलच्या पाण्यातून घाणेरडा वास आल्याने त्यांनी थांबून कॅनॉलमध्ये डोकावून पाहिले असता बारदाण्यामध्ये अर्धा पाण्यात व अर्धा पाण्याच्याकडेला पालथ्या अवस्थेमध्ये एका बालिकेचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी दीपक तारू यांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांना व लोणंद पोलीस स्टेशनला कळविली. त्यानंतर लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल माकणीकर तातडीने दाखल झाले, तर खंडाळा ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके दाखल झाले.
दरम्यान, यावेळी घटनास्थळी ‘टिंकू’ या श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. याप्रसंगी घटनास्थळी आढळलेल्या लहान मुलीच्या चपला व बारदाण्याचे वास टिंकूला दिला. मात्र, टिंकू श्वान घटनास्थळापासून काहीच अंतरावर घुटमळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. यावेळी कॅनॉलमध्ये पडलेल्या मृतदेहाची पाहणी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व पोलिसांनी करीत घटनास्थळी आढळलेल्या केसांचे व हाडांचे नमुने व बारदाणे पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, मृतदेह पूर्णपणे छिन्नविच्छिन्न व सडलेल्या अवस्थेत असल्याने तसेच पायांचे दोन्ही पंजे व एका हाताचे पंजे प्राण्यांनी किंवा माशांनी खाल्लेले असल्याने बालिकेच्या मृतदेहाची ओळख पटविणे अवघड बनले होते.
मात्र, रात्री उशिरा अहिरे येथील अपहरण केलेल्या गायत्री जमदाडेचे वर्णन व मृतदेहाचे वर्णन जुळत असल्याने संबंधित मृतदेहावरील कपडे व मृतदेह वडील संतोष जमदाडे यांना दाखविला असता, तो मृतदेह गायत्रीचाच असल्याचे निष्पन्न झाले. रात्री उशिरापर्यंत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल माकणीकर, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट लोणंद पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून होते. शवविच्छेदनासाठी पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आला. त्याठिकाणी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांचे पथक तपासासाठी रवाना झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: I did not return!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.