मी पवारांना 'कमळाचा बुके' दिलाय, पवार भेटीनंतर उदयनराजेंचं सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 10:33 AM2018-11-25T10:33:55+5:302018-11-25T10:35:19+5:30
पवारांच्या भेटीनंतर पत्रकारांनी 'महाराष्ट्र क्रांती पक्ष तुमचा फोटो वापरतो, मग आता लोकसभा निवडणूक घड्याळावर की कमळावर लढवणार?' असा प्रश्न विचारला
सातारा - महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार रविवारी कऱ्हाड मध्ये आले होते. कार्यक्रमस्थळी जाण्यापूर्वी एका हॉटेलमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते. यावेळीही उदयनराजेंनी लोकसभा निवडणुकीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
पवारांच्या भेटीनंतर पत्रकारांनी 'महाराष्ट्र क्रांती पक्ष तुमचा फोटो वापरतो, मग आता लोकसभा निवडणूक घड्याळावर की कमळावर लढवणार?' असा प्रश्न विचारला. त्यावर 'फोटो वापरत आहेत तर चांगलंच आहे की मग. माझा घसा बसलाय मी काय बोलू. माझ्या हातात घड्याळ आहे आणि शरद पवार यांना कमळाचा बुके दिलाय,' असे उत्तर देत उदयनराजेंनी स्मितहास्य केले. त्यामुळे उदयनराजेंच्या उमेदवारीबद्दल अद्यापही निश्चितता झाली नसल्याचे दिसून येते. दरम्यान, 'निवडणूक आली की राम मंदिर मुद्दा कसा निघतो, यावर तोडगा निघायला हवा. तसेच केवळ सवलती नको, सरळ ओबीसी आरक्षण द्या,' असे मतही उदयनराजेंनी व्यक्त केले.