जनतेच्या आशीर्वादाने पद मिळाले : प्रदीप विधाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:38 AM2021-04-18T04:38:47+5:302021-04-18T04:38:47+5:30
पुसेगाव : ‘आजपर्यंत राजकारणात पक्षाने मला विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. मला हे केवळ जनतेच्या आशीर्वादाने मिळालं आहे. ...
पुसेगाव : ‘आजपर्यंत राजकारणात पक्षाने मला विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. मला हे केवळ जनतेच्या आशीर्वादाने मिळालं आहे. याचा मला कधी विसर पडलेला नाही. जनतेच्या या ऋणातून उतराई होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करून लोकांना दिलेला शब्द पूर्ण करत आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केले.
कटगुण (ता.खटाव) येथील आमदार शशिकांत शिंदे व प्रदीप विधाते यांच्या फंडातून श्री चिलाई देवी मंदिराच्या सभा मंडपासाठी १० लाख व मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामांसाठी ३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच जयश्री कदम, उपसरपंच जयदीप गायकवाड, पंचायत समिती उपसभापती संतोष साळुंखे, रमेश शिंदे, माजी सरपंच उदय कदम, बाळासाहेब अभंग, महेश गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
१७कटगुण
कटगुण येथे आमदार शशिकांत शिंदे व जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या फंडातून मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन करताना, प्रदीप विधाते, सरपंच जयश्री गोरे, उपसरपंच जयदीप गायकवाड व पदाधिकारी उपस्थित होते.