प्रश्न मार्गी लावल्यानंतर मला पाणी पाजणाऱ्यांचे तोंड बंद होईल : उदयनराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:04 PM2019-06-03T13:04:47+5:302019-06-03T13:06:46+5:30

भविष्यातील पाण्याची गरज पाहता कास धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर बोंडारवाडी धरणाचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो मार्गी लावल्यानंतर मला पाणी पाजण्याची भाषा करणाऱ्यांचे तोंड तरी बंद होईल, असा उपरोधिक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

I will stop the water supply from the people after the questions are raised: Udayan Raje | प्रश्न मार्गी लावल्यानंतर मला पाणी पाजणाऱ्यांचे तोंड बंद होईल : उदयनराजे

प्रश्न मार्गी लावल्यानंतर मला पाणी पाजणाऱ्यांचे तोंड बंद होईल : उदयनराजे

Next
ठळक मुद्देप्रश्न मार्गी लावल्यानंतर मला पाणी पाजणाऱ्यांचे तोंड बंद होईल : उदयनराजेकास धरणातील पाणी परिस्थितीचा घेतला आढावा

सातारा : भविष्यातील पाण्याची गरज पाहता कास धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर बोंडारवाडी धरणाचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो मार्गी लावल्यानंतर मला पाणी पाजण्याची भाषा करणाऱ्यांचे तोंड तरी बंद होईल, असा उपरोधिक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

कास जलाशयातील पाणी परिस्थितीचा खासदार उदयनराजे यांनी सोमवारी सकाळी पालिकेचा पाणीपुरवठा विभाग व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

प्रारंभी कास व परिसरातील ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने सोडविल्या जातील, अशी ग्वाही उदयनराजे यांनी दिली. यानंतर ते म्हणाले, वाढते शहरीकरण, लोकसंख्येचा विचार करता कास धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या धरणाचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले आहे. सातारकरांना भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की कोणीही पाण्याचा अतिरेक करावा.

जलाशयात केवळ पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. नासाडी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पालिकेला देण्यात आल्या आहेत.

कासबरोबरच अनेक वर्षांपासून रखडलेल्या बोंडारवाडी धरणाच्या उभारणीसाठी ही माझे प्रयत्न सुरू सुरू आहेत. याबाबतचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहेत त्यासाठी वाट्टेल ते केले जाईल.

पाणीप्रश्न मार्गी लागल्यानंतर निदान आम्हाला पाणी पाजण्याची भाषा करणाऱ्यांचे तोंड तरी बंद होईल, असेही उदयनराजे म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष माधवी कदम, पाणीपुरवठा समिती सभापती श्रीकांत आंबेकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: I will stop the water supply from the people after the questions are raised: Udayan Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.