भागवत कुटुंबीय समाजासाठी आदर्श : मिलिंद नेवसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:40 AM2021-04-07T04:40:35+5:302021-04-07T04:40:35+5:30
फलटण : ‘भागवत कुटुंबीयांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत फलटणच्या ...
फलटण : ‘भागवत कुटुंबीयांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत फलटणच्या पूर्व भागात सामाजिक काम केले. यातूनच आपल्या मुलांना व नातीला उत्कृष्ट संस्कार देत समाजासाठी एक आदर्श घालून दिला आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी व्यक्त केले.
गोखळी येथील रूपेश भागवत, नीलेश भागवत, तसेच स्वरा भागवत या तिघांचा महाराष्ट्र माळी महासंघ व सामाजिक संस्था फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला.
रूपेश राजेंद्र भागवत यांची पीएसआयपदी निवड, नीलेश राजेंद्र भागवत पोलीस कॉन्स्टेबल व स्वरा योगेश भागवत हिचा उत्कृष्ट सायकलिंग व क्रीडापटू म्हणून तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दशरथ फुले, महाराष्ट्र राज्य माळी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब ननावरे, दत्तोपंत शिंदे, मनीष जाधव, परशुराम फरांदे, शिवाजी भुजबळ, विकास नाळे, संदीप नाळे, प्रा. संपतराव शिंदे, माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड, ज्येष्ठ नेते बापूराव काशीद, अरविंद राऊत, सातारा जिल्हा शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते उदयकुमार नाळे, आदर्श बहुजन शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेचे ज्येष्ठ नेते मारुती ढगे, अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त व आदर्श बहुजन शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजेश बोराटे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता आदी ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.