रक्तदान शिबिरातून आदर्श : संजीवराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:25 AM2021-06-19T04:25:42+5:302021-06-19T04:25:42+5:30
संजीवराजे ना . निंबाळकर लोकमत न्यूज नेटवर्क आदर्की : ‘कोरोनाच्या महामारीत रक्ताचा तुटवडा जाणवत असताना रक्तदान हे श्रेष्ठदान ...
संजीवराजे ना . निंबाळकर
लोकमत न्यूज नेटवर्क
आदर्की : ‘कोरोनाच्या महामारीत रक्ताचा तुटवडा जाणवत असताना रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे पटवून देऊन हिंगणगाव जिल्हा परिषद गटाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून फलटण तालुक्यापुढे आदर्श घालून दिले आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले आहे.
सासवड-झणझणे येथे जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट व माजी सभापती प्रतिभा घुमाळ यांच्या प्रयत्नातून हिंगणगाव जिल्हा परिषद गट, ग्रामपंचायत व फलटण मेडिकल फाउंडेशन संचालित रक्तपेढीच्या वतीने संयुक्तपणे विठ्ठल मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट, माजी सभापती दतात्रय गुंजवटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्या सारिका अनपट, माजी सभापती प्रतिभा धुमाळ, दूध संघाचे माजी संचालक म्हस्कू अनपट, विनायक अनपट, सरपंच राजेंद्र काकडे, उपसरपंच धर्मवीर अनपट उपस्थित होते.
संजीवराजे म्हणाले, ‘तरुणांना रक्तदानाचे महत्त्व पटवून जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करून राष्ट्रहित जोपासावे. हिंगणगाव जिल्हा परिषद गटाने रक्तदान शिबिर घेतले. याच धर्तीवर प्रत्येक जिल्हा परिषद गटात, गणात रक्तदान शिबिराचे आयोजन रक्ताचा तुटवडा भरून काढण्यात मदत करावी.’
धैर्यशील अनपट म्हणाले, ‘कोरोना महामारीत रक्तदात्यांची संख्या घटल्याने रक्तदान शिबिर घेण्याची संकल्पना पुढे आली. त्यास हिंगणगाव गटातील सरपंच व तरुणांनी सहकार्य केले आहे.’
कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य शिवाजीराव रासकर, मुळीकवाडीचे सरपंच गणेश कदम, टाकोबाईचीवाडीचे सरपंच कुणाल झणझणे, गुलाबराव जगताप, पराग भोईटे, शुभम नलवडे, गणेश पवार, सुरेश गायकवाड उपस्थित होते.