बनवडीतील घनकचरा व्यवस्थापन जिल्ह्यात आदर्शवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:42 AM2021-09-25T04:42:07+5:302021-09-25T04:42:07+5:30
कोपर्डे हवेली : ‘बनवडीचा घनकचरा प्रकल्प हा संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक आहे. जिल्ह्यातील गावासह राज्यातील गावांनी या प्रकल्पाचा आदर्श घेऊन ...
कोपर्डे हवेली : ‘बनवडीचा घनकचरा प्रकल्प हा संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक आहे. जिल्ह्यातील गावासह राज्यातील गावांनी या प्रकल्पाचा आदर्श घेऊन अनेक गावांनी असे प्रकल्प उभे केले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधी या प्रकल्पाची पाहणी करून आपल्या गावामध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्यात यावेत,’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गाैडा यांनी केले.
सातारा जिल्ह्याने पाणी व स्वच्छता कामामध्ये राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या अनुषंगाने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी ते बनवडी (ता. कऱ्हाड) येथील ग्रामपंचायतीच्या घनकचरा आणि पाणी प्रकल्पाची पाहणी केली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सोमटे, कऱ्हाडचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य सागर शिवदास, पंचायती समितीच्या सदस्या वैशाली वाघमारे, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोठावळे, अख्तर आत्तार, मोहन जानराव, सदस्या पल्लवी साळुंखे, विद्या शिवदास, स्वाती गोतपागर, अश्विनी विभुते आदींसह ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच विकास करांडे यांनी गांडूळखत तयार करण्याची सर्व प्रक्रिया समजून सांगितली. तसेच तयार होणारे गांडूळ खतापासून ग्रामपंचायतीला मिळते, याविषयी माहिती दिली. ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले यांनी २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जाद्वारे चालते, याविषयी माहिती दिली. त्यावेळी गौड यांनी दोन्ही प्रकल्पाचे कौतुक केले.
२४कोपर्डे हवेली
बनवडी (ता. कऱ्हाड) येथील घनकचरा प्रकल्पाची पाहणी करताना विनय गौडा, सागर शिवदास, विकास करांडे प्रदीप पाटील आदींची उपस्थिती होती.