तब्येत बरी नसेल तर शाळेत पाठवू नका..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:58 PM2018-09-28T22:58:58+5:302018-09-28T22:59:02+5:30

If not good, do not send it to school ..! | तब्येत बरी नसेल तर शाळेत पाठवू नका..!

तब्येत बरी नसेल तर शाळेत पाठवू नका..!

Next

सातारा : तब्येत बरी नसेल तर पाल्याला शाळेत पाठवू नका. पूर्ण बरं वाटल्यावरच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा, अशी नोटीस शहरातील बहुतांश शाळांच्या सूचना फलकांवर झळकल्या. स्वाईन फ्लूबाबत खबरदारीचा उपाय म्हणून शाळांनी असा निर्णय घेतला आहे.
सातारा शहरातील सर्वच शाळांमध्ये गेल्या काही दिवसांत संसर्गजन्य आजाराने विद्यार्थी त्रस्त आहेत. अभ्यास बुडेल, या भीतीने पालक सक्तीने आजारी असलेल्या पाल्याला शाळेत पाठवत आहेत. त्यामुळे वर्गातील इतर विद्यार्थ्यांनाही संसर्ग झाला आहे. सर्दी आणि तापाने त्रस्त असलेले अनेक विद्यार्थी सक्तीने शाळांमध्ये आल्यामुळे याचा संसर्ग शाळास्तरावर मोठ्या प्रमाणात
झाला.
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत स्वाईन फ्लूसदृश्य रुग्ण आढळल्याने शासकीय पातळीवरही याबाबत मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रुमालात किंवा खिशात कापूर ठेवण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत; पण गणेशोत्सव काळात रस्त्यांवर आणि देखावा पाहण्यासाठी उसळलेल्या गर्दीतूनही या संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे शाळेत याचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला.
साताऱ्यातील निवासी शाळा असलेल्या सैनिक स्कूलमध्येही स्वाईन फ्लूसदृश्य रुग्ण आढळल्याने अन्य मुलांना त्याची बाधा होऊ नये म्हणून शाळेला सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य शाळांमधील पालकांची पाचावर धारण बसली होती. विद्यार्थ्यांना आजारपणाच्या कारणाने सुटी घेऊन घरी ठेवले तर वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी मोठा खटाटोप करावा लागतो. त्यामुळे सर्दी, खोकल्यासारख्या आजाराने विद्यार्थी त्रस्त असताना शाळेत पाठविण्याची मानसिकता पालकांची राहते.
याबाबत काही पालकांनी शाळा व्यवस्थापनाशी संवाद साधला. त्यावेळी ‘संसर्गजन्य आजाराने त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय पुन्हा शाळेत हजर होता येईल,’ असा निर्वाळा देण्यात आला.
निवडक पालकांबरोबर झालेली ही चर्चा शुक्रवारी शाळेच्या सूचना फलकावरही झळकली.
त्यामुळे पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, शाळेत बुडलेला अभ्यास पालकांनी पाल्याकडून करून घेणं आणि त्यात काही शंका वाटल्यास वर्गात शिक्षकांना विचारण्याची मुभा शाळा व्यवस्थापनाने दिली आहे.
शाळेत लागलेल्या सूचना फलकामुळे अनेक पालक आणि विद्यार्थी
वाहतूक करणाºया वाहनचालकांनी याबाबत परस्परांना माहिती
दिली. आजारी विद्यार्थी न नेण्याचाही निर्णय वाहनचालकांनी केला
आहे.
दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढतीच!
गणेशोत्सवाच्या आधीपासून शहरात आलेल्या सर्दी, ताप आणि खोकला या आजारांच्या संसर्गाने सातारकर हैराण झाले आहेत. अनेक बाल रुग्णालयांमध्ये तर सकाळपासून अगदी रात्री उशिरापर्यंत रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक घरांमध्ये चिमुकल्यांसह ज्येष्ठांनाही या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे घराघरांमध्ये एखादा रुग्ण अगदी सहज सापडत आहे. घरगुती उपायाबरोबरच औषधांचा मारा सुरू असल्याने रुग्ण वैतागले आहेत. तर रुग्ण सेवा करून पालकही हैराण झाले आहेत. पुढील काही दिवसांत हा संसर्ग कमी होण्याचा कयास वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.


वाहनचालकांकडून घेतली जातेय आवश्यक काळजी
विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांमध्ये प्रवास करणाºया मुलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एका विद्यार्थ्याचा संसर्ग सहज दुसºयाला होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन वाहनचालकही आपल्या वाहनांमध्ये कापूर आणि नीलगिरीचे तेल ठेवत आहेत. संसर्गित विद्यार्थ्याबरोबरच इतरांनाही याचे वाटप होत आहे. शाळेत जाताना आणि येताना दोन्ही वेळेला याचे वाटप करून वाहनचालक याबाबत आवश्यक ती काळजी घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: If not good, do not send it to school ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.