एक भगदाड मुजविले तर दुसरीकडे पडले!

By admin | Published: September 17, 2016 10:35 PM2016-09-17T22:35:14+5:302016-09-18T00:06:34+5:30

आरळे पुलाची चाळण : पाच ब्रास खडीचा वापर झाल्याने वाहन चालकांमध्ये भीती; शशिकांत शिंदे यांच्याकडून पुलाची पाहणी

If one breaks down, on one hand! | एक भगदाड मुजविले तर दुसरीकडे पडले!

एक भगदाड मुजविले तर दुसरीकडे पडले!

Next

शिवथर : सातारा-लोणंद रस्त्यावरील आरळे-वडूथ येथील कृष्णा नदीवरील पुलावर तसेच पुलाच्या पायथ्याजवळ शुक्रवारी भगदाड पडले होते. त्यामुळे हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केला. पाच ब्रास खडी टाकून खड्डे मुजविले; परंतु त्याच रात्री दुसऱ्या ठिकाणी पुलाला पुन्हा भगदाड पडले. त्यामुळे पुलाची चाळण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आमदार शशिकांत शिंदे यांनी शनिवारी पुलाची पाहणी केली.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोल चुकविण्यासाठी सातारा-लोणंद रस्त्यावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. पुलावर झाडे वाढल्या असून, झाडाच्या मुळ्या खोल्यावर गेल्या आहेत.
पुलाच्या कडेला पोकळी निर्माण झाली आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
सातारा-लोणंद रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोन वर्षे लागतील; परंतु काही दुर्घटना घडू नये, यासाठी पुलाचे फोटो काढून दुरुस्तीचा प्रस्ताव दोन दिवसांमध्ये देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी निधी मिळावा म्हणून मंत्रांशी लवकर चर्चा करणार आहे.
त्यावेळी कृषी सभापती किरण साबळे-पाटील, बबनराव साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. एच. मोहिते, कार्यकारी अभियंता एल. एन. वाघमोडे, शाखा अभियंता डी. पी. वंजारी, सी. व्ही. कांत, मिलिंद कुलकर्णी, अरविंद पाटील, विजय कदम, आबा कासकर, अनिल वाघमळे, वैभव कदम उपस्थित होते. (प्रतिनिधी)


पुण्याच्या तज्ज्ञांना पाचारण
उन्हाळा सुरू असल्याने पुलाची परिस्थिती जाणवली नाही. सध्या पाऊस सुरू असल्याने भगदाड जाणवले. पुण्याचे तज्ज्ञ सोमवारी येणार असून, मंगळवार, बुधवारी काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ई. ई. वाघमोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
तीन महिन्यांपूर्वी कसली केली होती पाहणी?


चौथी घटना
या पुलाच्या कडेला आजवर चारवेळा भगदाड पडले आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी तात्पुरती मलमपट्टी न करता पुलाचे चांगल्या पद्धतीने काम करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांसाठी
एसटीची धडपड
हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी एसटीची फेरी कशी सुरू करायची, या संदर्भात सातारा आगारातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिवथर-बोरखळ, लिंब, कोरेगाव येथे जाऊन पाहणी केली असल्याचे सहायक वाहतूक अधीक्षक नौशाद तांबोळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: If one breaks down, on one hand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.