लक्षणे आढळल्यास न घाबरता तपासणी करून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:36 AM2021-05-22T04:36:16+5:302021-05-22T04:36:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे असूनही काही रुग्ण पुढे येऊन तपासणी करत नाही, एका व्यक्तीमुळे अख्खेच्या ...

If symptoms appear, check without fear | लक्षणे आढळल्यास न घाबरता तपासणी करून घ्या

लक्षणे आढळल्यास न घाबरता तपासणी करून घ्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे असूनही काही रुग्ण पुढे येऊन तपासणी करत नाही, एका व्यक्तीमुळे अख्खेच्या अख्खे कुटुंब बाधित होत आहे. ज्या कोणाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांनी न घाबरता तत्काळ रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करुन घ्यावी, असे भावनिक आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

गुरसाळे ता. खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. याचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटनप्रसंगी आमदार जयकुमार गोरे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, ‍‍‍शिवाजी सर्वगोड, पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम, संदीप मांडवे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. राज्याचे अधिक बजेट हे आरोग्यावर खर्च करण्यात येत आहे. प्रत्येक कोरोना बाधित रुग्णाला उपचार मिळाले पाहिजे, यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. कोरोना संसर्गाच्या पुढच्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अनुषंगाने राज्य शासन योग्य ते नियोजन करीत आहे. ३१ मे पर्यंत राज्यासह जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. १ जूनपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी न झाल्यास जून महिन्यातही जिल्ह्यात कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घ्यावा लागेल, याला जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी केले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जनतेने शासनाने घातलेले निर्बंध चांगल्या पद्धतीने पाळले, परंतु दुसऱ्या लाटेत निर्बंध पाळले जात नाहीत, यामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत आहे. तरी कोरोना संसर्गाची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.

फोटो ओळ :

गुरसाळे ता. खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार जयकुमार गोरे, प्रभाकर देशमुख आदींची उपस्थिती होती.

Web Title: If symptoms appear, check without fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.