टेंभूचे पाणी आमच्या छाताडावरून पुढे नेले तर कालवा उडवून देऊ, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 02:18 PM2022-06-06T14:18:21+5:302022-06-06T14:19:00+5:30

निवडणुका आल्या की राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून षडयंत्र रचून आमदार जयकुमार गोरेंवर खोट्या केसेस नेहमीच दाखल केल्या जातात. आताही तसेच षडयंत्र रचले गेले आहे

If the water of Tembu is carried forward from our umbrella, we will blow up the canal, Ranjit Singh Naik Nimbalkar warning | टेंभूचे पाणी आमच्या छाताडावरून पुढे नेले तर कालवा उडवून देऊ, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा इशारा

टेंभूचे पाणी आमच्या छाताडावरून पुढे नेले तर कालवा उडवून देऊ, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा इशारा

Next

दहीवडी : ‘आमदार जयकुमार गोरेंनी १३ वर्षांत माण-खटाव मतदारसंघाचा कायापालट केला. त्यांनी उरमोडीच्या दोनशे किलोमीटर लांबीच्या कालव्याची रेष मारली. त्यांनी दुष्काळी मातीला पाणी द्यायचे मोठे काम केले आहे. विरोधकांनी त्यापेक्षा मोठी रेष मारायची हिम्मत दाखवावी. जयाभाऊ शब्द पाळणारे नेते आहेत. टेंभूचे पाणी आमच्या छाताडावरून पुढे नेले तर कालवा आणि पूल उडवून देऊ,’ असा इशारा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.

बोराटवाडी येथे आयोजित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, उपजिल्हाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, भगवानराव गोरे, अर्जुन काळे, धनाजी जाधव, अतुल जाधव, सिद्धार्थ गुंडगे, वसंतराव मासाळ, हरिभाऊ जगदाळे, विलासराव देशमुख, संजय गांधी, अकील काझी, सोमनाथ भोसले, बाळासाहेब माने, अर्जुन खाडे, विशाल बागल, शिवाजी जगदाळे उपस्थित होते.

खासदार निंबाळकर म्हणाले, ‘‘निवडणुका आल्या की राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून षडयंत्र रचून आमदार जयकुमार गोरेंवर खोट्या केसेस नेहमीच दाखल केल्या जातात. आताही तसेच षडयंत्र रचले गेले आहे. लवकरच आमचा कार्यकाळ सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वच विरोधकांनी शिष्टाचाराचे राजकारण करावे. जिहेकठापूरसाठी आम्ही केंद्रातून निधी आणल्यानेच योजनेची उर्वरित कामे मार्गी लागत आहेत. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपचे संघटन वाढण्याची भीती वाटल्यानेच त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले गेले आहे.’

तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे म्हणाले, ‘बहुआयामी नेतृत्व असलेल्या आमदार गोरेंनी माढ्यात राष्ट्रवादीच्या भ्रमाचा भोपळा फोडला होता. पाणीप्रश्न इतर इतर विकासकामांसाठी थेट पंतप्रधान मोदींकडून निधी आणणारे आमचे नेतृत्व सर्व बाजूंनी सक्षम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपचे संघटन आणखी मजबूत होणार आहे. आमदार गोरेंच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप वर्चस्व निर्माण करणार आहे. भाजपच्या केंद्रातील योजनांमुळे सर्वसामान्य जनतेला अनेक लाभ मिळत आहेत.’ प्रताप भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

Web Title: If the water of Tembu is carried forward from our umbrella, we will blow up the canal, Ranjit Singh Naik Nimbalkar warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.