उद्योगात गुंडप्रवृती येत असेल तर मोडून काढू; पालकमंत्र्यांचा उद्योजकांना विश्वास 

By नितीन काळेल | Published: December 21, 2023 09:18 PM2023-12-21T21:18:53+5:302023-12-21T21:19:25+5:30

साताऱ्यात इंडस्ट्रियल एक्स्पोचे उद्घाटन...

If there is hooliganism in the industry, we will break it; Guardian Minister trusts entrepreneurs | उद्योगात गुंडप्रवृती येत असेल तर मोडून काढू; पालकमंत्र्यांचा उद्योजकांना विश्वास 

उद्योगात गुंडप्रवृती येत असेल तर मोडून काढू; पालकमंत्र्यांचा उद्योजकांना विश्वास 

सातारा : राज्य शासन उद्योजक आणि उद्योगांबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे साताऱ्यातील एमआयडीसीतही नवीन उद्योग यावेत, प्रगती व्हावी यासाठी सर्वोताेपरी प्रयत्न केले जातील. यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून ‘मास’चे प्रश्न मार्गी लावू. त्याचबरोबर येथील एमआयडीसीत गुंडप्रवृती येत असेल, प्रगतीला अडथळा होणार असेलतर ती मोडून काढू, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उद्योजकांना दिला.

सातारा येथील जिल्हा परिषद मैदानावर मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशन आॅफ सातारा (मास) आयोजित मास इंडस्ट्रियल एक्स्पोचे उद्घाटन करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, सचिव धैर्यशिल भोसले, कूपर कार्पोरेशनचे अस्लम फरास, हिंदुस्थान फिडसचे अध्यक्ष नितीन माने, वसंतराव फडतरे, श्रीकांत पवार, युवराज पवार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘सातारा एमआयडीसीला खूप जुनी परंपरा आहे. येथे मोठ्या आणि नामांकित कंपन्या आणि उद्योग होते. एमआयडीसीच्या जवळ उद्योग वाढवायचे असतील तर सुरुवातीला खूप विरोध होतोच. साताऱ्याच्या एमआयडीसी संदर्भात निगडी, वर्णे येथील शेतकऱ्यांचे काही गैरसमज असतील तर ते सोडवले पाहिजेत. उद्योगवाढीसाठी शासनही सकारात्मक असून सातारा तसेच जिल्ह्यातील एमआयडीसीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण भेटू. त्यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील.

मासचे अध्यक्ष मोहिते म्हणाले, मासची स्थापना १९९८७ साली उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात आली. आपण आज उद्योगातून १३ हजार कोटी रुपयांची निर्यात करत आहोत. हे शक्तीस्थान आपण अधोरेखित केलेले आहे. विद्याऱ्श्यांनी या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन उद्योजक व्हावे, अशी अपेक्षा आहे.

धैर्यशील भोसले यांनी साताऱ्यातील उत्पादने जागितक पातळीवर जाण्याचा हा प्रयत्न आहे असे सांगतानाच सातारा एमआयडीसीत ९०० उद्योजक चांगल्याप्रकारे काम करत असल्याचा विश्वासही व्यक्त केला.

एमआयडीसीबाबत गैरसमज नको -
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा एमआयडीसबाबत आवाहन केले. ते म्हणाले, सातारा एमआयडीसी वाढविण्यासाठी मर्यादित पर्याय आहेत. तेच आपल्याला वापरावे लागणार आहेत. काहींची एमआयडीसी नको अशी धारणा आहे. पण, शासनाचीही धोरणे बदललीत. रेडीरेकनरपेक्षा चारपटीने जादा पैसे दिले जातात. त्यामुळे लोकांतील गैरसमज बदलावे लागणार आहेत. निगडी, वर्णे भागात एमआयडीसी वाढली पाहिजे. कारण, येथील महामार्गाची संलग्नता असल्याने त्याचा फायदा घेण्याची गरज आहे. एमआयडीसीसाठी बागायती जमिनी नको आहेत. ज्या पडीक आहेत, पाणी पोहोचत नाही ती जमीन द्यावी, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजेंनी केले.
 

Web Title: If there is hooliganism in the industry, we will break it; Guardian Minister trusts entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.