साताऱ्यात घर खरेदी करायचयं तर एक जुलैच्या आत करा!
By admin | Published: June 15, 2017 05:32 PM2017-06-15T17:32:46+5:302017-06-15T17:32:46+5:30
घरे होणार महाग : जी एस टी कराचा फ्लॅट खरेदी ग्राहकांना बसणार फटका
ूआॅनलाईन लोकमत
वाठार स्टेशन (जि. सातारा), दि. १६ : साताऱ्यात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांनो जर तुम्हाला साताऱ्यात घर हव असेल तर ते १ जुलै च्या आत मध्येच घ्या अन्यथा आपल्याला १२ टक्के जी एस टी कराचा अतिरिक्त फटका सहन करावा लागणार आहे.
गेल्या अनेक वषार्पासून सातारा जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. शासनाच्या वेगवेगळ्या धोरणामुळे आज ग्राहकांनी बांधकाम व्यवसायाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. सातारा शहरात आज जवळपास १० ते १५ हजार फ्लॅट ग्राहकांविना पडून आहेत, असे असताना आता शासनाने रेरा व जी एस टी सारखे नवीन कायदे अंमलात आणल्याने यापुढे सातारा जिल्हात बांधकाम व्यवसाय करणे मोठे डोकेदुखीच ठरणार आहे.
फ्लॅट खरेदी करताना फ्लॅट च्या किंमती व्यतिरिक्त ग्राहकाला साठेखत करताना १ टक्के व्हॅट, ४.५०टक्के सर्व्हिस टॅक्स, ५ टक्के स्टॅम्प ड्युटी, १ टक्के रजिस्ट्रेशन असे एकूण ११.५० टक्के टॅक्स भरावा लागत होता.मात्र १ जुलै पासून नव्याने अस्तित्वास आलेल्या जी एस टी करानुसार यात ६.५० टक्के वाढ होऊन आता ११.५० ऐवजी १८ टक्के कर ग्राहकाला भरावा लागणार आहे. यामध्ये पूर्वी भरत असलेल्या सर्व्हिस टॅक्स व व्हॅटच्या ऐवजी आता १२ टक्के जी एस टी कर, ५ टक्के स्टॅम्प ड्युटी असा एकूण १८ टक्के कर भरावा लागणार आहे. यासाठी जर जी एस टी करापासुन सुटका हवी असेल तर १ जुलै पुर्वी आपल्याला फ्लॅट खरेदी करुन रजिस्टेशन करावे लागणार आहे.
जीएसटी आणि रेगा मुळे आॅनलाईनवर भर
जी एस टी प्रमाणेच आता रेरा हा बांधकाम व्यवसायासाठी नवा कायदा १ मे २०१७ पासून अमलात आला असून या कायद्याप्रमाणे बांधकाम व्यवसाय करणाऱ्याला आपला प्रत्येक प्रकल्प आॅनलाईन पध्दतीने रजिस्टेशन करावा लागणार आहे. केवळ बांधकाम व्यवसायिकच नव्हे तर आत्तापर्यंत फ्लॅट चे खरेदी विक्री चे व्यवहार करणाऱ्या एजंटांना सुध्दा रजिस्टर नंबर घ्यावा लागणार आहे. तसेच आज सुरु असलेल्या मात्र अद्याप बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेतलेल्या सर्वांनाच रेरा मध्ये १ मे पासून ९० दिवसांच्या आत आपले सर्व प्रकल्प रजिस्टर करावे लागणार आहेत. रेरा कायद्यात फ्लॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकाला घरबसल्या बांधकाम व्यावसायिकाच्या प्रत्येक प्रकल्पाची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाकडून होणारी फसवणूक थांबणार आहे. बांधकाम व्यावसायिकांनी ही प्रकल्प साकारताना कोणकोणत्या सुख सुविधा दिल्या जाणार आहेत, त्या सर्व बाबिंचा तपशील रेरा मध्ये प्रकल्प नोंदणी करताना करावा लागणार आहे