असे कराल तर होणार आता गुन्हा दाखल : त्यामुळे घरी बोलवू नका काही करू नका उगाच सापडाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 11:45 AM2020-04-30T11:45:19+5:302020-04-30T11:47:07+5:30

कोरोना विषाणू या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सर्व स्तरांवर मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने शासनाने व जिल्हा प्रशासनाने अनेक प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत. यानुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू असून

If you do that, you will be charged now: So don't call home, don't do anything, you will be found! | असे कराल तर होणार आता गुन्हा दाखल : त्यामुळे घरी बोलवू नका काही करू नका उगाच सापडाल !

असे कराल तर होणार आता गुन्हा दाखल : त्यामुळे घरी बोलवू नका काही करू नका उगाच सापडाल !

Next
ठळक मुद्देकेशकर्तनालय व्यवसाय सुरू केल्यास गुन्हातेजस्वी सातपुते : घरी बोलवणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार

सातारा : संचारबंदी कालावधीत केशकर्तनाचा व्यवसाय करू नये, अन्यथा संबंधित व्यक्तीस तसेच केशकर्तनाला घरी बोलवणाºया व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल,ह्ण असा इशारा सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.

कोरोना विषाणू या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सर्व स्तरांवर मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने शासनाने व जिल्हा प्रशासनाने अनेक प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत. यानुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाने या काळात कालावधीत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू वितरण वगळता सर्व आस्थापनांवर बंदी घालण्यात आली आहे.

यानुसार केशकर्तनालय सुरू करण्यास बंदी असून, त्याचा कोणत्याही व्यक्तीने भंग केल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल. कोणत्याही व्यक्तीने बंदी आदेशाचा भंग करून केशकर्तनालय दुकान सुरू करू नये. तसेच संचारबंदी कालावधीत शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून अथवा विनंतीवरून त्यांच्या घरी जाऊन केशकर्तनाचा व्यवसाय करू नये, अन्यथा संबंधित व्यक्तीस तसेच केशकर्तनाला घरी बोलवणाºया व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असे महाराष्ट्र नाभिक महामंडळाला कळविले आहे.

 

Web Title: If you do that, you will be charged now: So don't call home, don't do anything, you will be found!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.