हिम्मत असेल तर गड राखून दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 10:48 PM2018-09-30T22:48:17+5:302018-09-30T22:48:21+5:30

If you have the courage, then show the fort | हिम्मत असेल तर गड राखून दाखवा

हिम्मत असेल तर गड राखून दाखवा

Next

खटाव/पुसेगाव : ‘सामान्य माणसाच्या अडचणी जाणून भाजपा सरकारने काम करण्यास सुरुवात केल्यामुळे विरोधकांची आता झोप उडाली आहे. कोरेगाव, माण, खटाव, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिणमध्ये होत असलेले बदल पाहून हे गड आता गेले, याची भीती लागल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली आहे. आता मात्र आम्ही उघड आव्हान देतो. हिम्मत असेल तर गड सुरक्षित राखा,’ असे आव्हान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
खटाव येथे गौरीशंकर कॉलेजच्या मैदानावर गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शेतकरी मेळावा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पिंपरी चिंचवड प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपा प्रदेश सचिव मकरंद देशपांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भरत अमळकर, महेश शिंदे, अनिल देसाई, माजी आमदार दिलीप येळगावकर, खटावच्या सरपंच रत्नप्रभा घाडगे, राहुल पाटील, पंचायत समिती सदस्या नीलादेवी जाधव, डॉ. अरुणा बर्गे, पुसेगावच्या सरपंच हेमा गोरे, अनिरुद्ध जगताप, मदन जगताप, भरत मुळे, रणधीर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘पश्चिम भागात पाऊस आहे तर पूर्व भागात पाऊस नाही. अशा गावांना पाणी देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. जिहे कटापूर योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू दिवगंत ‘लक्ष्मणराव इनामदार जलसंयोजना’ हे नाव देण्यात आले आहे.’
कटगुण ग्रामपंचायतींच्या नूतन सरपंच जयश्री गोरे व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल देसाई, शेखर चरेगावकर, सदाशिव खाडे यांची भाषणे झाली.
महेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संदीप शिंदे व शहाजी भोसले यांनी सूत्रसंचालन केले. भरत मुळे यांनी आभार मानले.
यावेळी रणधीर जाधव, पंचायत समिती सदस्या निलादेवी जाधव, अभयराजे घाडगे, शिवाजी शेडगे, अ‍ॅड. श्रीनावास मुळे, मनोज नलवडे, संजय नलवडे, डॉ. महेश भिसे, उमेश भिसे, अंकुश पाटील यांच्यासह विविध गावचे सरपंच उपस्थित होते.
आमदार कोरेगावचा.. राहतो मुंबईत...
स्वत:च्या मुलाला कसे पक्षाचे अध्यक्षपद दिले, या विचाराने दुखावल्या गेलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वत:च्याच पक्षाच्या नेत्याविरोधात एल्गार केला आहे. आमदार कोरेगावचा, राहतो मुंबईमध्ये, कार्यकर्त्यांची गाठ घेतो सहा महिन्यांतून, मुंबईत राहून आमदार म्हणून निवडून देणाऱ्या मतदारांना पाहावयास म्हणून मी खास आलो आहे,’ अशी कोपरखळी यावेळी महाजन यांनी मारली.
.. ते शेतकºयांची व्यथा काय जाणणार?
पश्चिम महाराष्ट्रात भाजपाच्या कमळाने आपला रंग दाखवायाला सुरुवात केली आहे. हा बदल पाहून कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडू लागली आहे. माथाडी कामगारांचा नेता शेतकºयांच्या व्यथा काय जाणणार,’ असा घणाघात यावेळी माजी आमदार दिलीप येळगावकर यांनी केला.
टंचाई जाहीर करावी
महेश शिंदे यांनी ‘जिहे-कटापूर योजना कोरेगाव-खटावची रक्तवाहिनी आहे. या योजनेमुळे या भागाचा कायापालट होणार आहे. वसना-वांगणा पूर्ण झाली आहे. अद्यापही कोरेगावच्या पूर्व भागात तसेच खटावच्या उत्तर भागात टंचाई आहे. त्यामुळे टंचाई जाहीर करावी,’ अशी मागणी यावेळी महेश शिंदे यांनी केली.

Web Title: If you have the courage, then show the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.