योजनांचा फायदा घेतला तर दुष्काळ पुसेल : महादेव जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:44 PM2018-10-28T22:44:13+5:302018-10-28T22:44:53+5:30
म्हसवड : ‘माण-खटावमधील शेतकऱ्यांवरील दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्यांतर्गत राबविल्या जाणाºया विविध योजनांचा फायदा येथील शेतकºयांनी घेतला ...
म्हसवड : ‘माण-खटावमधील शेतकऱ्यांवरील दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्यांतर्गत राबविल्या जाणाºया विविध योजनांचा फायदा येथील शेतकºयांनी घेतला तर हा शिक्का पुसण्यास निश्चितच मदत होईल. या खात्यांतर्गत राबविल्या जाणाºया योजनांमध्ये महिलांना प्राधान्य देणार आहे,’ अशी ग्वाही मंत्री महादेव जानकर यांनी दिली.
म्हसवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पशुसंवर्धन विभाग माणच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक बँकेच्या मदतीतून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प शेळी एक उच्च मूल्यवर्धित व्यवसाय अंतर्गत बोकड मेळावा पार पडला.
मंत्री जानकर म्हणाले, ‘मागेल त्याला पशुधनासाठी योजना देण्यासाठी १५ कोटींची तरतूद राज्य शासनाने केली आहे. सर्व योजना आॅनलाईन असल्याने मध्यस्थांची दलाली बंद करण्यात यश आले आहे. तर सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे. पशुखात्याला नुकताच केंद्रातून ७५ कोटींचा निधी मंजूर करून आणलाय. दुष्काळी भागातील शेतकºयांच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी व शेतकºयाचा माल साठवून ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज साखळी माण तालुक्यात निर्माण करणार आहे. शासनाच्या विविध योजना शेतकºयांच्या हिताच्या आणल्या आहेत. देशी गायीलाही सबसिडीत आणले आहे. पूर्वी जर्सी गाय सबसिडीत होत्या. प्रत्येक शेतकºयांनी देशी खिलार गाय पाळावी. राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकºयाचा मुलगा उद्योगपती करायचाय. शेतकºयांना मागेल त्याला शेततळ्याच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय करावा.’