टायर वापराचे अज्ञान देतेय अपघातांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:39 AM2021-03-26T04:39:00+5:302021-03-26T04:39:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : उन्हाळा वाढला की महामार्गावर टायर फुटून होणाऱ्या अपघातांचे एक-एक किस्से अंगावर शहारे आणतात. टायर ...

Ignorance of tire use invites accidents | टायर वापराचे अज्ञान देतेय अपघातांना निमंत्रण

टायर वापराचे अज्ञान देतेय अपघातांना निमंत्रण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : उन्हाळा वाढला की महामार्गावर टायर फुटून होणाऱ्या अपघातांचे एक-एक किस्से अंगावर शहारे आणतात. टायर फुटल्यामुळे होणाऱ्या अपघातांत महामार्गावर दरवर्षी डझनभरांना प्राण गमवावा लागला आहे. टायरची झीज ही नुसत्या रनिंगमुळेच नव्हे, तर अलाईनमेंट, रस्त्यांची खराब स्थिती, टायरमधील कमी-जास्त हवेचा दाब, ड्रायव्हिंगची पद्धत... अशा अनेक गोष्टींमुळे होते. टायरच्या वापराविषयी असलेले अज्ञान हे याचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे.

सातारा शहरातील वाहनधारकांच्या मानसिकतेचा विचार केला, तर गाडीच्या टायर्सची स्थिती आणि रिस्क यांची जाण किंवा यावर कधी कोणीच फारसे गांभीर्याने घेत नाही. एवढी वर्षे किंवा एवढे किलोमीटर्स झाले की टायर बदलणार, असं ठरवणं मुळात चुकीचं आहे. टायरची ही झीज कमी व्हावी यासाठी वेळोवेळी अलाईनमेंटवर लक्ष ठेवणे, ३ ते ५ हजार किलोमीटर्सनंतर टायर रोटेशन करणे, जास्त स्पीडमध्ये टर्न न घेणे, वेळोवेळी निव्वळ ब्रेक्सवर गाडी कंट्रोल करणे टाळावे. शक्य तितकी गीअरमध्ये कंट्रोल करण्याची सवय असावी. त्याबरोबरच एअर प्रेशरवर लक्ष ठेवणे, सस्पेंशन खराब झालं असेल किंवा अँगल चेंज झाला तरी एक टायर झिजते. मेकॅनिकच्या सल्ल्याने ते बदलावे.

टायर केव्हा बदलावे?

नक्षीच्या गॅपमध्ये मार्किंग असतं, त्या मार्किंगला नक्षी टेकली की रिस्क सुरू होते.

अलाईनमेंट खराब असेल तर एक बाजू झिजते. असा टायर वापरू नये.

खूप दिवस वापर नसेल तरी टायर्स हार्ड होतात, तेही वापरू नयेत.

ट्युबवाले टायर असतील आणि गाडी खूप दिवस एका जागी उभी राहिली, तर टायरमध्ये एअर येते आणि गाडी व्हॉयबल होते. टायरला जिथे फुगा येतो, तिथे तो फुटू शकतो किंवा तारा बाहेर येतात.

कोट :

गाडी चालविताना अनेकांचे टायरकडे दुर्लक्ष होते. पंक्चर झाल्यावरच अनेकदा टायरच्या प्रकृतीकडे लक्ष देतात. वास्तविक पाहता, उत्तम गुणवत्तेचे टायर असावेत. आठवड्यातून एकदा हवा भरणे, टायर व्यवस्थित रोजच्या रोज तपासणे, कमी हवेत गाडी न चालवणे याचे पथ्य पाळले गेले पाहिजे. पेट्रोल पंपावरील यंत्र कधी कधी चुकीचे मापन दर्शवते. त्यामुळेही टायरची झीज होते.

- फिरोज शेख, व्यावसायिक, सातारा

रिमोल्ड टायरचे दुखणे!

सरासरी कोणत्याही चारचाकीच्या नव्या आणि रिमोल्ड केलेल्या टायरमध्ये जास्तीत जास्त तीन ते साडेतीन हजार रुपयांचा फरक असतो. याचा सरासरी हिशेब केला, तर प्रति किलोमीटर जेमतेम २५ पैसे वाचत असावेत. विशेष म्हणजे टायर फुटून अपघात झाला, तर विमा कंपनी याची नुकसान भरपाई देत नाही. खराब टायर्समुळे गाडीचा स्मूथनेस कमी होतो. ग्रीप कमी झाल्याने स्टेबलिटी राहत नाही, सस्पेन्शन कमी जाणवतं, माईलेज कमी होतं. या सगळ्याचा हिशेब केला, तर आपण जे पैसे वाचवतो किंवा याचं गांभीर्य लक्षात न घेता टाळाटाळ वा आळस करतो, त्यापेक्षा खूप जास्त रिस्क घेत असतो किंवा जास्त किंमत मोजत असतो.

टायर न बदलण्याची कारणे...

अजून एक पाऊस तरी जायला हवा

(खरं तर ग्रीपची गरज पावसातच जास्त असते)

मी कुठे गाडी पळवतोय?

माझं रनिंग जास्त नाही

टायरवर खर्च करायला माझ्याकडे पैसे नाहीत (घसरून पडल्यास गाडी दुरुस्ती आणि डॉक्टरला द्यायला मात्र आहेत.)

तुझं टायरचं दुकान आहे का? की तुला टायरवाले कमिशन देतात?

Web Title: Ignorance of tire use invites accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.